नवी दिल्ली 02 ऑगस्ट : सोशल मीडियावर (Social Media) सध्या गुजरातमधील (Gujarat) सासन गिरच्या देवलिया पार्कमधील एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे. या व्हिडिओमध्ये असा दावा केला जात आहे, की सिंह देवलिया पार्कमध्ये पोहोचला असून आरामात रस्त्यावर फिरत आहे. सिंहाचा हा व्हायरल व्हिडिओ (Viral Video of Lion) पाहून नेटकरीही थक्क झाले आहेत. मात्र, गुजरातच्या रस्त्यांवर सिंह फिरताना दिसण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही असे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.
महिलेसमोरच कपडे काढून प्रायव्हेट पार्ट दाखवू लागला पोलीस; सांगितलं विचित्र कारण
गुजरातमधील सासन गिर नॅशनल पार्क एक अशी जागा आहे जिथे हिंस्त्र सिंहदेखील रस्त्यावर फिरताना दिसतात. हा व्हिडिओ सोशल मीडियावर ट्विटर यूजर @zubinashara नं शनिवारी शेअर केला आहे. व्हिडिओला दिलेल्या कॅप्शनमध्ये त्यांनी सांगितलं, की सासन गिर देवलिया पार्कमध्ये दाखल होताना किंग. 15 सेकंदाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यात एक सिंह रस्त्यावर एकदम आरामात फिरताना दिसत आहे.
Meanwhile king entering Devaliya park, Sasan Gir#TwitterNatureCommunity #wildlife pic.twitter.com/wAQfxzW1u3
— Zubin Ashara (@zubinashara) July 31, 2021
जबड्यातील कुत्र्याला सोडून मगरीने ठोकली धूम; नेमकं काय घडलं तुम्हीच पाहा VIDEO
हा व्हिडिओ कधी शूट केला गेला आहे, याबाबतची माहिती दिली गेली नाही. मात्र, सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. लोक हा व्हिडिओ शेअरही करत आहेत. तसंच कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रियाही देत आहेत. या ट्विटवर प्रतिक्रिया देत आयएफएस अधिकारी @surenmehra यांनी विचारलं, की हा जंगलातून आला आहे का? याचं उत्तर देत यूजरनं लिहिलं, की हा वाला जंगलातील आहे, कारण हा पार्कच्या बाहेरून आलाय. आणखी एका यूजरनं कमेंट करत म्हटलं, की हे दृश्य कोणालाही हैराण करेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: R gujarat lion, Video viral