नवी दिल्ली 24 जुलै : कोरोनापासून (Coronavirus) बचावासाठी देशभरात लसीकरण (Corona Vaccination) मोहीमेला वेग देण्यावर भर देण्यात येत आहे. लस घेण्यासाठी अनेकजण बरेच प्रयत्न करत आहेत. त्यामुळे, लसीकरण केंद्रावर भरपूर गर्दी पाहायला मिळते. मात्र, हीच गर्दी अनेकदा प्रशासनासाठी डोकेदुखी ठरते. असंच एक प्रकरण आता मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) खरगोन जिल्ह्यातून समोर आलं आहे. इथले लसीकरणासाठी आलेल्या महिलाच आपसात भिडल्या आणि त्यांच्यात हाणामारी सुरू झाली. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Video Viral on Social Media) झाला आहे.
'या' लग्नानं नवा इतिहास घडवला; संपवलं दोन गावांमधील 200 वर्षे जुनं वैर
खरगोनच्या कसरावद येथील खलबुजुर्ग गावातील हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. यात दिसतं की दोन महिला लसीकरण केंद्रातच हाणामारी करू लागल्या आहेत. व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की लसीकरण केंद्रावर महिलांची मोठी रांग लागलेली आहे. यादरम्यान आधी लस कोण घेणार यावरुन अनेक महिलांमध्ये वाद सुरू झाले. आधी किरकोळ वाद आणि नंतर त्याचं थेट हाणामारीत रुपांतर झाल्याचं यात पाहायला मिळतं. प्रकरण इतकं पुढे गेलं की लस घेण्यासाठी रांगेत थांबलेल्या महिला एकमेकींचे केस ओढू लागल्या. इतकंच नाही तर काही महिलांमध्ये तर धक्काबुक्कीही सुरू झाली.
मध्यप्रदेश के खरगोन में वैक्सीन को लेकर महासंग्राम, pic.twitter.com/fo1Oh2gxHo
— Ramurti Holkar (@Ramholkar_) July 23, 2021
अनेकांचा जीव घेणारी दरड कोसळते तेव्हा नेमकं काय होतं? Live Video पाहून हादराल!
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की काही पुरुष महिलांचं हे भांडण सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र ते अपयशी ठरतात. तर, काही लोकांचं असं म्हणणं आहे, की सेंटरवर योग्य व्यवस्था नसल्यामुळे हे भांडण झालं आहे. ज्याला जिथून जागा मिळाली तिथून तो सेंटरमध्ये घुसला, यामुळे तिथल्या कर्मचाऱ्यांच्या कामातही अडथळा आला. याआधीही मध्य प्रदेशच्या धारमध्ये लसीकरण केंद्रावर लोकांची गर्दी झाल्यानं एकच गोंधळ उडाला होता. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona vaccination, Madhya pradesh, Shocking video viral