मराठी बातम्या /बातम्या /मनी /

UPI पेमेंट करताना सावध रहा, छोटीशी चूक बँक अकाऊंट रिकामं करेल, काय खबरदारी घ्याल?

UPI पेमेंट करताना सावध रहा, छोटीशी चूक बँक अकाऊंट रिकामं करेल, काय खबरदारी घ्याल?

डिजिटल पेमेंट किंवा व्यवहारांसाठी अधिक अॅप्स वापरू नका. कारण अनेक अॅप वापरताना गैरसमज होण्यास वाव असतो. अॅपमध्ये काही समस्या असल्यास मदत केंद्राची मदत घ्या. याबाबतीत बाहेरच्या कोणाचीही मदत घेऊ नका.

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 20 डिसेंबर : भारतात ऑनलाईन किंवा डिजिटल व्यवहार (Online Trasacion) अनेक पटींनी वाढले आहेत आणि ही वाढ सुरूच आहे. ऑनलाइन पेमेंट (Online Payment) इतकं सोपं झालंय की आता लोक चहाच्या दुकानात पाच रुपयेही ऑनलाइन भरतात. ऑनलाइन पेमेंटचे जग जितके सोपे आहे, तितकेच त्यात सतर्क राहण्याचीही गरज आहे. कारण थोडासा निष्काळजीपणा तुमचे बँक खाते (Bank Account) रिकामे करू शकतो.

यावेळी तुमचा मोबाईल हा तुमचे पाकीट आणि बँक खाते आहे. त्यामुळे व्यवहारादरम्यान थोडासा निष्काळजीपणा झाला तरी तुम्ही सहज सायबर फ्रॉडचे (Cyber Fraud) लक्ष्य बनू शकता. त्यामुळे मोबाईल अॅप (Mobile App) वापरताना सतर्क राहणे आणि सुरक्षेशी संबंधित उपायांचे पालन करणे आवश्यक आहे.

UPI अॅड्रेस शेअर करू नका

सायबर फसवणूक टाळण्यासाठी तुमचा UPI अॅड्रेस कधीही कोणाशीही शेअर करू नका. तुमचा UPI अॅड्रेस तुमचा फोन नंबर, QR कोड किंवा व्हर्च्युअल पेमेंट अॅड्रेस (VPA) मधील काहीही असू शकतो. तुम्ही कोणत्याही पेमेंट किंवा बँक अॅप्लिकेशनद्वारे तुमच्या UPI खात्यात प्रवेश करू देऊ नये. अनेकदा लोकांना फोन येतात की ते बँक किंवा पेमेंट अॅप कंपनीशी बोलत आहेत आणि ते तुम्हाला तुमच्या डिजिटल व्यवहारांशी संबंधित माहिती विचारतात. हे अजिबात करू नका, कारण हे कॉल फसवे असतात.

Mutual Fund मधून पैसे काढताना या गोष्टी लक्षात ठेवा, मेहनतीच्या पैशांचं नुकसान होणार नाही

UPI अॅप अपडेट करत रहा

लोक अनेकदा ही चूक करतात की ते पेमेंटसाठी वापरत असलेले अॅप ठेवत ठेवत नाहीत. मोबाईल अॅप अपडेट करत राहणे महत्त्वाचे आहे. UPI पेमेंट अॅपसह प्रत्येक अॅप लेटेस्ट व्हर्जनमध्ये अपग्रेड केले जावे कारण अॅप अपडेट्स तुमचे अॅप अधिक सुरक्षित करतात. अॅप्सना नवीनतम आवृत्तीमध्ये अपग्रेड केल्याने तुमचे खाते सुरक्षित राहते.

अनेक अॅप्सचा वापर करु नका

डिजिटल पेमेंट किंवा व्यवहारांसाठी अधिक अॅप्स वापरू नका. कारण अनेक अॅप वापरताना गैरसमज होण्यास वाव असतो. अॅपमध्ये काही समस्या असल्यास मदत केंद्राची मदत घ्या. याबाबतीत बाहेरच्या कोणाचीही मदत घेऊ नका.

Share Market updates: शेअर मार्केटवर Omicron चा परिणाम, Sensex आणि Nifty मध्ये मोठी घसरण

अनोळखी लिंक्स किंवा फेक कॉल्स अटेंड करू नका

विचार न करता कोणत्याही अज्ञात लिंकवर क्लिक करू नका. UPI स्कॅमचा वापर हॅकर्स यूजर्सना अडकवण्यासाठी करतात. हॅकर्स लिंक शेअर करतात किंवा कॉल करतात आणि यूजर्सना पडताळणीसाठी नवीन अॅप डाउनलोड करण्यास सांगतात. तुम्ही अशा लिंकवर कधीही क्लिक करू नये किंवा पिन किंवा इतर कोणतीही माहिती कोणाशीही शेअर करू नये. बँका कधीही पिन, ओटीपी किंवा इतर कोणतेही वैयक्तिक तपशील विचारत नाहीत.

First published:

Tags: Money, Online payments, Upi