नवी दिल्ली, 11 नोव्हेंबर : सोशल मीडियावर (Social Media) दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत असतात. यात प्राण्यांमधल्या चकमकीच्या क्लिप्स (Clips) सर्वाधिक पाहिल्या जातात. सोशल मीडियावरच्या काही व्हिडिओमधले प्रसंग खरे आहेत की खोटे हेदेखील पाहणं गरजेचं असतं. कारण लाइक्स, कमेंट्स मिळवण्यासाठी काही व्हिडिओ एडिटिंग तंत्राचा (Editing Technique) वापर करून रोमांचक बनवण्याचं प्रमाण अलीकडच्या काळात वाढल्याचं दिसून येतं. अर्थात हे व्हिडिओ फेक असल्याचं कालांतरानं स्पष्ट होतं; पण काही कालावधीसाठी का होईना असे व्हिडिओ चर्चेत येतात हे नक्की.
एक कुत्रा (Dog) काही वाघांशी (Tiger) लढतानाचा व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला आहे. नदीत डुंबत असलेल्या वाघांवरून हा कुत्रा उडी मारताना या व्हिडिओत दिसत आहे. ज्या युझर्सनी हा व्हिडिओ पाहिला आहे, त्या प्रत्येकानं आश्चर्य व्यक्त केलं आहे. परंतु, आश्चर्यकारक गोष्ट अशी की शेअर करण्यात आलेला व्हिडिओ प्रत्यक्षात खोटा (Fake) असल्याचं स्पष्ट झालं आहे.
हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो वेळा पाहिला गेला आहे. यासोबतच अनेक माध्यम संस्थांनीही हा व्हिडिओ चालवला आहे. या व्हायरल व्हिडिओत एक कुत्रा अनेक वाघांवरून उडी मारताना दिसत आहे. हे दृश्य पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. अनेकांनी या कुत्र्याच्या शौर्याचं कौतुक केलं आहे. काहींनी तर हा व्हिडिओ पाहताना क्षणभर श्वास रोखला गेल्याचं म्हटलं आहे. परंतु, प्रत्यक्षात हा व्हिडिओ खोटा आहे.
हे ही वाचा-
तरुणानं मगरीच्या जबड्यात घातला हात; चवताळलेल्या मगरीनं केला हल्ला अन्.., VIDEO
हा व्हिडिओ पाहताना सुरुवातीला तुम्हालादेखील आश्चर्य वाटेल. एक कुत्रा अत्यंत शौर्यानं वाघांच्या अंगावरून उडी मारताना या व्हिडिओत दिसत आहे; मात्र यानंतर व्हिडिओमधल्या वाघांकडे बघणंही आवश्यक आहे. एडिटिंगच्या मदतीनं हे वाघ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फिरताना दाखवण्यात आलं आहे. यात एका वाघानं वरील बाजूल उडी मारल्यानंतर हा व्हिडिओ खोटा असल्याची खात्री होते. हा व्हिडिओ एडिट करून अधिक रोमांचक बनवला गेला आहे.
कमेंट सेक्शनमध्ये (Comment Section) अनेकांनी या व्हिडिओचा खोटेपणा उघड केला आहे. आतापर्यंतचं सर्वांत खराब एडिटिंग असल्याचं काही जणांनी कमेंटमध्ये सांगितलं आहे. अशा प्रकारे व्हिडिओ तयार करून कशासाठी शेअर केले जातात, असा सवाल एका युझरने विचारला आहे. कुत्र्याचा हा व्हिडिओ आतापर्यंत अनेकवेळा बघितला गेला आहे. हा व्हिडिओ premkumar8040 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून (Instagram Account) शेअर केला गेला आहे. लोकांच्या कमेंट्समधून सत्य स्पष्ट होऊनही हा व्हिडिओ खरा असल्याचं सांगत अनेक ठिकाणी शेअर करण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.