लखनऊ, 5 जानेवारी: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांमध्ये (
UP election) बाईक रॅली काढून शक्तिप्रदर्शन (
Rally) करता करता एका कार्यकर्त्याचा (
Party worker) भलताच पोपट झाला. रॅली सुरू असताना बाईकवर उभा राहून स्टंट करणारा हा कार्यकर्ता अचानक बॅलन्स गेल्यानं खाली (
Fell down) कोसळला. याचं थेट प्रसारण सुरू असल्यामुळे या घटनेचा व्हिडिओ बघता बघता व्हायरल झाला.
बसपाच्या रॅलीत गोंधळ
बहुजन समाज पक्षाच्या उमेदवार नीलम मधुबन यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार सुरू होता. यावेळी काही उत्साही कार्यकर्ते रॅलीच्या सर्वात पुढच्या भागांमध्ये स्टंटबाजी करत होते. एक दुसरा कार्यकर्ता उभा राहिला आणि आणि खांद्यावर चढून स्टंट करू लागला. सर्वांचं लक्ष वेधून घेण्याचा यशस्वी प्रयत्न हे कार्यकर्ते करत होते. त्यांना उपस्थितांकडून वाहवा देखील मिळत होती. मात्र तेवढ्यात गाडी चालवणाऱ्या कार्यकर्त्याचा बॅलन्स गेला आणि दोघेही धाडकन खाली कोसळले.
झाली फजिती
हा कार्यक्रमात स्थानिक वाहिनीवरून थेट प्रसारण सुरू असल्यामुळे ही घटना बघता बघता पूर्ण परिसरात वार्यासारखी पसरली. अनेकांनी या घटनेच्या व्हिडिओ क्लिप्स वायरल करायला सुरुवात केली. या कार्यकर्त्यांची अनेकांनी थट्टा करायला सुरुवात केलीच, शिवाय बहुजन समाज पक्षाच्या प्रचारावरही अनेक मीम्स आणि जोक्स तयार झाले.
हे वाचा-
सापामुळे झाला Chain Accident! ट्रकने मारला ब्रेक, बसने तोडले बॅरिकेड्स
निवडणुकीचा माहौल
सध्या पूर्ण देशाचे लक्ष उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांकडे लागलं आहे. सर्व पक्षांनी या निवडणुकीत आपली ताकद आणि प्रतिष्ठा पणाला लावली आहे. पुन्हा एकदा भाजप इथे सत्ता राखण्यात यशस्वी ठरणार की येथे सत्तापालट होणार यावर गरमागरम चर्चा रंगते आहे. त्यातच अशा काही घटना घडल्यामुळे निवडणुकीतली रंगत वाढत चालल्याचंच स्पष्ट होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.