मराठी बातम्या /बातम्या /Viral /Burj Khalifa च्या टॉपवरील तरुणीचा तो व्हिडिओ रिअल की फेक? नवा VIDEO शेअर करत एअरलाइन्सनं दिलं उत्तर

Burj Khalifa च्या टॉपवरील तरुणीचा तो व्हिडिओ रिअल की फेक? नवा VIDEO शेअर करत एअरलाइन्सनं दिलं उत्तर

बुर्ज खलिफाच्या उंच टोकावर उभ्या असलेल्या अशाच एका तरुणीचा (Woman on Burj khalifa top) व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता अमीरात एअरलाइन्सनं हा व्हिडिओ बनवतानाची प्रक्रिया दाखवणारा आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे.

दुबई, 14 ऑगस्ट : जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफावर (Burj khalifa) जाणं अनेकांचं स्वप्नं असतं. बुर्ज खलिफावर जाऊन उंचावरून दिसणारं सौंदर्य पाहण्याचं मजा काही औरच. बुर्ज खलिफाच्या उंच टोकावर उभ्या असलेल्या अशाच एका तरुणीचा (Woman on Burj khalifa top) व्हिडीओ (Video viral) सोशल मीडियावर (Social media) व्हायरल झाला होता. आता अमीरात एअरलाइन्सनं हा व्हिडिओ बनवतानाची प्रक्रिया दाखवणारा आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे.

अमीरात एअरलाइन्सनं ट्विट करत याला कॅप्शनही दिलं. कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं, की हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा खरा आहे की फेक असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला होता. याच प्रश्नाचं उत्तर आम्ही या व्हिडिओमधून देत आहोत. अशा प्रकारे आम्ही जगातील सर्वात उंच इमारतीवर हा व्हिडिओ बनवला. या ट्विटमध्येच एअरलाइन्सनं व्हिडिओ बनवतानाची संपूर्ण प्रक्रियाही ट्विट केली आहे.

VIDEO : समुद्राच्या मधोमध कपलनं बांधली लग्नगाठ; वऱ्हाडी म्हणून कुत्र्यांची हजेरी

याआधी व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत होतं, की बुर्ज खलिफाच्या टॉपवर एक तरुणी उभी आहे. त्या तरुणीच्या हातात एक बोर्ड आहे. ही तरुणी जाहिरात करताना दिसते. यूएईतील एअरलाइन्स कंपनी अमीरात एअरलाइन्सची (Emirates airline) ही जाहिरात होती. जी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली. ही तरुणी अमीरात फ्लाइटची अटेंडंट (Flight Attendant on Burj Khalifa) आहे. 30 सेकंदाची ही जाहिरात आहे.

जगातील ही सर्वात उंच इमारत आहे. 828 मीटर इतकी त्याची उंची आहे. एअरलाइनने दिलेल्या माहितीनुसार 828 मीटर उंच इमारतीच्या उंचीवर उभं राहण्यासाठी फक्त 1.2 मीटर जागा होती. हे शूट करण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात आला.

First published:

Tags: Shocking video viral, Stunt video