जाहिरात
मराठी बातम्या / Viral / एका हातात ई-रिक्षाचा हँडल अन् दुसऱ्या हातात बाळ; एका आईचा डोळ्यात पाणी आणणारा संघर्ष, VIDEO

एका हातात ई-रिक्षाचा हँडल अन् दुसऱ्या हातात बाळ; एका आईचा डोळ्यात पाणी आणणारा संघर्ष, VIDEO

आईच्या संघर्षाचा भावुक करणारा व्हिडिओ

आईच्या संघर्षाचा भावुक करणारा व्हिडिओ

म्हणजे महिलेनं एका हाताने ई-रिक्षाचं हँडल पकडलं आहे. तर दुसऱ्या हाताने तिने आपल्या मुलाला पकडलं आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली 07 जुलै : आईचं प्रेम हे सगळ्यात निस्वार्थी असतं. लोक आईला फायटर देखील म्हणतात. कारण ती आपल्या मुलाला सर्व प्रकारच्या संकटांपासून वाचवू शकते. एकटी आई आपल्या मुलांसाठी संपूर्ण जगाशी लढू शकते आणि त्यांच्यासाठी संघर्षही करू शकते. आता याचंच आणखी एक नवं उदाहरण समोर आलं आहे. यात एक गरीब आई आपल्या मुलाचं आणि आपलं पोट भरण्यासाठी ई-रिक्षा चालवताना दिसत आहे. महिला एका हाताने मुलाला सांभाळत दुसऱ्या हाताने रिक्षा चालवताना दिसली. पिल्लांना वाचवण्यासाठी कुत्र्याची सापासोबत भयानक झुंज; VIDEO चा शेवट आणेल अंगावर काटा महिलेचा ई-रिक्षा चालवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक महिला ई-रिक्षा चालवत आहे. विशेष म्हणजे महिलेनं एका हाताने ई-रिक्षाचं हँडल पकडलं आहे. तर दुसऱ्या हाताने तिने आपल्या मुलाला पकडलं आहे. तिने आपल्या मुलाला आपल्या हात आणि पाय यांच्यामध्ये झोपवलं आहे. महिलेनं रिक्षा थांबवल्यानंतर प्रवासी रिक्षात बसतात. यानंतर ती पुन्हा एका हाताने ई-रिक्षा चालवण्यास सुरुवात करते आणि दुसऱ्या हाताने आपल्या मांडीवर असलेल्या चिमुकल्याला पकडते. मुलासाठी आईचा चाललेला हा संघर्ष भावुक करणारा आहे.

जाहिरात

आईच्या प्रेमाचा आणि संघर्षाचा हा व्हिडिओ ‘खामोश कलम’ नावाच्या हँडलवरुन ट्विटरवर शेअर केला गेला आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचेही डोळे पाणावले. हा व्हिडिओ 5 जुलै रोजी पोस्ट करण्यात आला होता. आतापर्यंत तो 5.5 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. अनेकांनी यावर कमेंट करत महिलेचं कौतुक केलं आहे. आतापर्यंत 12 हजारहून अधिकांनी हा व्हिडिओ लाईकही केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात