नवी दिल्ली 07 जुलै : आपलं कुटुंब आणि मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न आला तर आई-वडील कोणत्याही थराला जायला तयार असतात. यावेळी ते स्वतःच्या जीवाचाही विचार करत नाहीत. हे फक्त माणसांनाच नाही तर प्राण्यांनाही लागू होतं. आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी प्राणीही काहीही करायला तयार होतात. याचा पुरावा एका व्हायरल व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. ज्यामध्ये अनेक कुत्रे एका सापाला घेरून त्याच्यावर हल्ला करताना दिसत आहेत. यामागचं कारण म्हणजे त्यांना आपल्या पिल्लांना त्या सापापासून वाचवायचं आहे. @ilhanatalay_ नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर नुकताच एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये अनेक कुत्रे एका सापावर हल्ला करताना दिसतात. ते सापाची अवस्थात काय करतात हे यात तुम्ही पाहू शकता. साप किती विषारी आणि धोकादायक असतात हे तुम्हाला माहीतच असेल. सापांच्या अनेक प्रजाती अशा आहेत की ते एका हल्ल्यातच मोठ्या प्राण्याचाही जीव घेतात. मात्र या व्हिडिओमध्ये वेगळंच दृश्य पाहायला मिळत आहे.
व्हिडिओमध्ये दिसणारा साप कोणत्या जातीचा आहे हे कळू शकलेलं नाही. पण त्याचा आकार आणि हल्ला करण्याची पद्धत खूपच धोकादायक आहे. व्हिडिओमध्ये दिसतं, की कुत्र्याला तो साप झुडपात दिसला. यानंतर कुत्र्याने त्याला तोंडात पकडून जोरात बाहेर ओढलं आणि जमिनीवर फेकलं. यानंतर इतर दोन कुत्र्यांनीही सापाला घेरलं. तिथे आसपास कुत्र्यांची पिल्लंही दिसतात. जर सापाने त्यांच्यावर हल्ला केला तर पिल्लांचा मृत्यू होऊ शकतो. हा व्हिडिओ पाहून असं वाटतं, की हे श्वान आपल्या पिल्लांना सापापासून वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. या व्हिडिओला 1 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत तर अनेकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. व्हिडिओ काढणाऱ्या व्यक्तीने जाऊन सापाचा जीव वाचवायला हवा होता, असं अनेकांचं म्हणणं आहे. त्याचवेळी, काही लोक म्हणाले की हा साप विषारी वाटत नाही. अनेकजण कुत्र्यांचं कौतुक करत आहेत. एकाने म्हटलं - एकतेत ताकद असते. तर दुसऱ्याने कमेंट केली, की साप कुत्र्याला चावला असावा कारण तो ओरडत होता.