जाहिरात
मराठी बातम्या / Viral / व्यसनाला पर्याय नाही! Ventilator वर असणाऱ्या रुग्णाचा तंबाखू मळतानाचा VIDEO VIRAL

व्यसनाला पर्याय नाही! Ventilator वर असणाऱ्या रुग्णाचा तंबाखू मळतानाचा VIDEO VIRAL

व्यसनाला पर्याय नाही! Ventilator वर असणाऱ्या रुग्णाचा तंबाखू मळतानाचा VIDEO VIRAL

सोशल मीडियावर एका व्यक्तीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral on Social Media) होत असल्याचं पाहायला मिळत आहे. हा व्यक्ती व्हेंटिलेटरवर (Ventilator) आहे, मात्र हा व्हिडिओ व्हायरल होण्याचं कारण आहे त्याला लागलेलं तंबाखूचं व्यसन.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 24 एप्रिल : कोरोनानं देशात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे रुग्णालयांमध्ये बेड आणि ऑक्सिजन मिळवण्यासाठीही रुग्णांच्या नातेवाईकांना रांगेत उभा राहून वाट पाहावी लागत आहे. ऑक्सिजन मिळवण्यासाठी रुग्णांचे नातेवाईक अनेक प्रयत्न करत आहेत. अशाता आता सोशल मीडियावर एका व्यक्तीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral on Social Media) होत असल्याचं पाहायला मिळत आहे. हा व्यक्ती व्हेंटिलेटरवर (Ventilator) आहे, मात्र हा व्हिडिओ व्हायरल होण्याचं कारण आहे त्याला लागलेलं तंबाखूचं व्यसन. व्हायरल झालेला हा व्हिडिओ पाहून काही नेटकऱ्यांना हसू आवरत नाहीये तर काहींनी या घटनेबाबत नाराजी व्यक्त केली आहे. या व्हिडिओमध्ये गंभीर असलेला एक व्हेंटिलेटरवरील रुग्ण दिसत आहे. त्याच्या तोंडामध्ये ऑक्सिजन पाईप आहे. मात्र, तो आपले हात अशा पद्धतीनं एकमेकांवर घासत आहे, जसं तंबाखू किंवा गुटखा मळतात.

जाहिरात

VIDEO: ‘2 कानाखाली खाशील’, ऑक्सिजनची मागणी करणाऱ्याला केंद्रीय मंत्र्यांचं उत्तर व्हिडिओमध्ये दिसत आहे, की या व्यक्तीजवळ एक महिला बसलेली आहे. तर, नर्सही जवळच आहे. मात्र, तो स्वतःच्याच नादात व्यग्र आहे. ही संपूर्ण घटना एका व्हिडिओमध्ये कैद झाली आहे. हा व्हायरल व्हिडिओ आयपीएस ऑफिसर रुपिन शर्मा (Rupin Sharma) यांनी शेअर केला आहे. याला दिलेल्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं, दुसरी गरजेची गोष्ट. ‘छोड़ेंगे न तेरा साथ… मरते दम तक’…दारु अजूनही लिस्टमध्ये टॉपवर आहे. व्हिडिओच्या बॅकग्राऊंडमध्ये छोड़ेंगे न साथ तेरा साथी मरते दम तक हे गाणं सुरू आहे. ट्विटरवर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांनी कधीही म सुटणारी सवय, अशा कमेंट या व्हिडिओवर केल्या आहेत. अनेकांनी हा व्हिडिओ रिट्विटदेखील केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात