पाटणा 23 एप्रिल : कोरोना संकटाच्या काळात देशाची आणि बहुतेक राज्यांतील परिस्थिती ही अत्यंत गंभीर आहे. देशातील सर्वाधिक बाधित राज्यांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा (Shortage of Oxygen) मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. अशात आता भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत असून यात ते गरजूंना मदत करण्याऐवजी भलतंच सुनावत असल्याचं पाहायला मिळत आहे. या व्हिडिओमध्ये दिसणारे वरिष्ठ नेते आहेत दमोह लोकसभेचे खासदार आणि केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल ( Viral Video of Prahlad Patel) .
पटेल यांचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. केंद्रीय मंत्री बुधवारी दमोह जिल्हा रुग्णालयात पाहणीसाठी गेले होते. याचदरम्यान पटेल जेव्हा बातचीत करत होते, तेव्हा हा व्हिडिओ बनवला गेला. या घटनेनंतर व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. व्हिडिओमध्ये एक अत्यंत काळजीमध्ये असणारा व्यक्ती पटेल यांच्याकडे येऊन म्हणाला, आई आजारी आहे, तिला ऑक्सिजन सिलेंडर मिळत नाहीये, एक तास झाला, मात्र अजूनही मिळाला नाही. यावर पटेल म्हणाले, आधी तुझी भाषा सुधार, असं बोलशील तर दोन कानाखाली खाशील
मंत्र्यांचं हे विधान ऐकून ऑक्सिजनची मागणी करणारा व्यक्ती म्हणाला, हो मी दोन खाईल, माझी आईदेखील खाण्यासाठी तिथे पडली आहे. सांगा आम्ही काय करू. 36 तासांपासून काळजीत आहे. ऑक्सिजन सिलेंडर मिळाला तर तो केवळ पाच मिनिटे चालला. देऊ शकत नसाल, तर सरळ नकार द्या. यानंतर कसं तरी हे प्रकरण शांत करण्यात आलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Shocking video viral, Video viral