नवी दिल्ली, 13 नोव्हेंबर : बिबट्या, हत्ती आणि मगर (Crocodile) घरात घुसल्याचे अनके व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. सध्या असाच एक थरारक व्हिडिओ चर्चेचा विषय ठरला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक मगर दिसत आहे. ही मगर एका घरात घुसलीय. हा व्हिडिओ टि्वटरवर @MajorFactor2 नावाच्या हँडलवरून शेअर केला गेला आहे. 52 सेकंदाच्या या व्हिडिओत विशालकाय मगर एका घराच्या आवारात फिरताना दिसून येत आहे. मगर सहसा जलक्षेत्रात किंवा वनक्षेत्रात आढळते. मगरीला (Crocodile) लांबून पाहिलं, तरी अंगाला घाम फुटतो. मग ही मगर घरात घुसली आणि अचानक तुमची नजर तिच्यावर पडली, तर काय गोंधळ उडेल याचा विचारही करवत नाही. मगरीला पाहून घाबरून कोणाचीही बोलती बंद होणं स्वाभाविक आहे. अशा धोकादायक प्राण्यासमोर शौर्य दाखवण्याचा प्रयत्न क्वचितच कोणी करेल; मात्र व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये दिसतं, की संबंधित व्यक्तीने शक्कल लढवली आणि मगरीला चक्क डस्टबिनमध्ये बंद केलं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social media) खूप व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर या व्हिडिओला (Crocodile Viral Video) नेटकऱ्यांनी प्रचंड पसंती दिली आहे. मगर पकडायची वेळ आलीच, तर वन विभागाच्या (Forest Department) कर्मचाऱ्यांना बोलावण्याशिवाय पर्याय नसतो; मात्र या व्हिडिओमधल्या व्यक्तीने कोणाचीही वाट न पाहता स्वतःच मगरीला पकडण्याचं काम केलं आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की एक व्यक्ती मोठ्या डस्टबिनमध्ये मगरीला घुसवण्याचा प्रयत्न करतेय. तो माणूस मगरीच्या दिशेने डस्टबिन घेऊन जातो. मगर मागे-मागे सरकत असल्याचं दिसतं. तेव्हाच धाडस दाखवून मगरीला डस्टबिनमध्ये घुसवण्यात त्याला यश येतं. मगर डस्टबिनमध्ये जाताच तो ताबडतोब डस्टबिनचं झाकण बंद करतो. ही मगर घरात कशी आली याबद्दल कोणालाही कल्पना नाही. मगरीने थेट घरात प्रवेश केल्याने घबराट उडणं स्वाभाविक होतं; मात्र त्या व्यक्तीने हिंमत न हारता प्रसंगावधान दाखवून मगरीला पकडलं. हे ही वाचा- आंधळा असूनही शेफनं अनोख्या पद्धतीनं कापली काकडी; VIDEO पाहून घालाल तोंडात बोटं हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आतापर्यंत या व्हिडिओला 9 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या प्रकारे मगरीला पकडण्यासाठी मोठे धाडस लागते. हा व्हिडिओ पाहून नेटकरी विविध प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.
Bruh said by any means necessary.🤔😂 🐊 pic.twitter.com/V89Sy0auce
— Jimmy 🖤💙✨ (@MajorFactor2) September 29, 2021
नेटकऱ्यांनी संबंधित व्यक्तीचं भरभरून कौतुक केलं असून, त्याला खऱ्या आयुष्यातला हिरो म्हटलं आहे. यापूर्वीही मगर घरात घुसल्याचे विविध ठिकाणचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. मगर हा एक उभयचर (जमिनीवर व पाण्यात राहणारा) प्राणी असून, तो खाऱ्या आणि गोड्या या दोन्ही प्रकारच्या पाण्यात राहतो.