जाहिरात
मराठी बातम्या / Viral / मुसळधार पावसात धबधब्याने धारण केलं रौद्ररूप; क्षणभरात वाहून गेली मोठमोठी वाहनं, थराकाप उडवणारा VIDEO

मुसळधार पावसात धबधब्याने धारण केलं रौद्ररूप; क्षणभरात वाहून गेली मोठमोठी वाहनं, थराकाप उडवणारा VIDEO

मुसळधार पावसात धबधब्याने धारण केलं रौद्ररूप; क्षणभरात वाहून गेली मोठमोठी वाहनं, थराकाप उडवणारा VIDEO

शनिवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास टँकर, बोलेरो पिक-अप आणि एक ओम्नी व्हॅन अशी तीन मोठी वाहनं वाहून गेली. अचानक आलेल्या पाण्याच्या प्रवाहामुळे ही वाहनं कामंग नदीत वाहून गेली

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

Arunachal Pradesh Heavy Rain : देशभरात अनेक ठिकाणी मुसळधार पावसानंतर आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्यामुळे लोकांच्या समस्या कमी होण्याचं नाव घेत नसल्याचं चित्र आहे. अरुणाचलमध्येही मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांनी रौद्ररूप धारण केलं आहे. या प्रवाहासोबत मोठमोठी वाहनंही वाहून गेल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या घटनेचा थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर आला आहे. बुरखा घालून प्रेयसीला भेटायला जाणं पडलं महागात; नाशकातील तरुणासोबत घडला भयंकर प्रकार, VIDEO शनिवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास टँकर, बोलेरो पिक-अप आणि एक ओम्नी व्हॅन अशी तीन मोठी वाहनं वाहून गेली. अचानक आलेल्या पाण्याच्या प्रवाहामुळे ही वाहनं कामंग नदीत वाहून गेली. या घटनेचा थरकाप उडवणारा व्हिडिओही समोर आला आहे.

जाहिरात

सुदैवाने या घटनेत तिन्ही वाहनांचे सर्व चालक सुखरूप बचावले असल्याचं समोर आलं आहे. दोन चालकांची ओळख पटली आहे. विनय केआर पासवान (48) आणि मो. मुक्तार हुसेन (33 वर्षे) अशी त्यांची नावं आहेत. हा रस्ता सुरळित सुरू करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, याठिकाणी सातत्याने चिखल आणि पाण्याचा जोराचा प्रवाह असल्याने यात अडचणी येत आहेत. अनियंत्रित कारने वाटेत येणाऱ्या सगळ्यांना उडवलं; ठाण्यातील विचित्र अपघाताचा CCTV Video सध्या अरुणाचल प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक भागात सततच्या पावसामुळे नद्या-नाले तुंबले आहेत. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

समोर आलेल्या व्हिडिओमध्ये दिसतं की अगदी काही क्षणातच ही गाडी पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून जाते आणि दरीत कोसळते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात