लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी नाशिक 25 सप्टेंबर : सोशल मीडियावर सध्या मुलं पळवणाऱ्या टोळी संबंधित चुकीच्या अफवा पसरवल्या जात आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. विशेष म्हणजे काही ठिकाणी मुलं पळवणाऱ्या टोळीच्या संशयातून निष्पाप नागरिकांवर हल्ला झाल्याचा प्रकारही समोर आला आहे. नाशिकमध्ये या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. नाशिक शहरात दोन दिवसांत मुलं चोरण्याच्या संशयावरून मारहाणीच्या तीन घटना समोर आल्या आहेत.
मुलं चोरणारी महिला समजून निराधार महिलेला मारहाण, चाळीसगावमधील धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये पुन्हा मुलं चोर समजून मारहाण झाल्याच्या दोन घटना समोर आल्या आहेत. यात प्रेयसीला भेटायला गेलेल्या तरुणाला मारहाण करण्यात आली. प्रियकर तरुण बुरखा घालून आल्याने जमावाने मुलं चोर समजून त्याला बेदम मारहाण केली. नाशिकच्या वडाळा गावात ही घटना घडली.
प्रेयसीला भेटायला गेलेल्या तरुणाला मारहाण करण्यात आली. प्रियकर तरुण बुरखा घालून आल्याने जमावाने मुलं चोर समजून त्याला बेदम मारहाण केली. नाशिकच्या वडाळा गावात ही घटना घडली. pic.twitter.com/GtadWd2UNz
— News18Lokmat (@News18lokmat) September 25, 2022
तर दुसरी घटना सिडकोच्या राणा प्रताप चौकात घडली. यात पोलिसांसमोरच महिलेला धक्काबुक्की करण्यात आली. भीक मागणाऱ्या महिलेला मुलं चोरणारी टोळी समजून जमावाने मारहाण केली. नाशिक शहरात दोन दिवसांत मुलं चोरण्याच्या संशयावरून मारहाणीची तिसरी घटना समोर आली.
नाशिक जिल्ह्यात मुलं चोरणारी टोळी सक्रीय नसल्याचा खुलासा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी केला आहे. अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. pic.twitter.com/K9BErHDlIp
— News18Lokmat (@News18lokmat) September 25, 2022
याआधी शनिवारीच एक घटना समोर आली होती, ज्यात गाडीतील पैसे चोरी करण्याच्या उद्देशाने आलेल्या दोघांना मुलं चोरणारी टोळी समजून बेदम मारहाण करण्यात आली होती. मुले चोरणारी टोळी समजून दोघांना बेदम मारहाण; नाशिकमधील घटनेचा VIDEO आला समोर दरम्यान नाशिक जिल्ह्यात मुलं चोरणारी टोळी सक्रीय नसल्याचा खुलासा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी केला आहे. सोशल मीडियावरील अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिला आहे.