Home /News /viral /

कोरोना काळात नोकरी गेली आणि देवच पावला; दुबईतील भारतीय तरुणाला लागली करोडोंची लॉटरी

कोरोना काळात नोकरी गेली आणि देवच पावला; दुबईतील भारतीय तरुणाला लागली करोडोंची लॉटरी

कोरोनाच्या काळाला नोकरी गेल्यानं पोट कसं भरायचं हा मोठा प्रश्न त्याच्या समोर उभा राहिला होता. पण त्याला लॉटरी (Lottery) लागल्यानंतर आता त्याच संकट कमी झालं आहे.

  युएई, 23 डिसेंबर : कोरोनाच्या (Covid 19) संकटामुळे जगभरात अनेक जणांना नोकरी गमवावी लागली आहे. अशीच काहीशी परिस्थिती दुबईमधील (Dubai) एका भारतीय व्यक्तीवर आली होती. परंतु म्हणतात ना देव पाठीशी असतो. या व्यक्तीला देखील अशाच गोष्टीचा परिचय आला असून या संकटाच्या काळातच त्याला लॉटरी लागली आहे. कोरोनाच्या काळाला नोकरी गेल्यानं पोट कसं भरायचं हा मोठा प्रश्न त्याच्या समोर उभा राहिला होता. पण त्याला लॉटरी (Lottery) लागल्यानंतर आता त्याच संकट कमी झालं आहे. मूळचा केरळमधील रहिवासी असणारा 30 वर्षीय नवनीत संजीवन (Navaneeth Sajeevan) हा मागील चार वर्षांपासून अबुधाबीमध्ये नोकरी करतो आहे. परंतु कोरोनाच्या या संकटकाळात त्याची नोकरी गेली. यामुळे तो नवीन नोकरीच्या शोधात होता. सध्या तो नोटीस पिरिअडवर होता. या काळात विविध ठिकाणी नोकरीसाठी तो मुलाखती देखील देत होता. त्यावेळी त्याला लॉटरीचा फोन आला आणि त्याच नशीबच बदललं. नवनीत संजीवन (Navneet Sanjeevan) हा केरळातील कासारगोडचा रहिवासी. सध्या तो पत्नी आणि मुलासोबत अबुधाबीत राहतो. 22 नोव्हेंबरला त्याने रॅफल तिकीट ऑनलाईन विकत घेतलं. त्यानंतर त्याला एक दिवस नोकरीच्या मुलाखतीवेळी लॉटरीचा फोन आला. हा फोन त्याचं आयुष्य बदलून टाकणारा होता.

  (वाचा - VIDEO प्रभुदेवाच्या गाण्यावर नाचताना चिमुरडीने फोडला TV,पाहा नेमकं काय झालं)

  आयुष्य बदलून टाकणारा हा फोन दुबई ड्युटी फ्रीमधून (Dubai Duty Free-DDF)होता. डीडीएफ मिलेनियम मिलियनेअर ड्रॉमध्ये (DDF Millennium Millionaire Draw) तुम्हाला एक मिलियन यूएस डॉलरची (USD 1 million) लॉटरी लागली आहे, असं त्याला सांगण्यात आलं. म्हणजेच अंदाजे 7 कोटी 30 लाखांची ही लॉटरी त्याला लागली. त्याला ही रक्कम चार जणांबरोबर शेअर करावी लागणार आहे. या विषयी बोलताना त्याने म्हटलं, सध्या माझी पत्नी दुबईमध्ये नोकरी करत असून, मी नोकरी न मिळाल्यास घरी जाण्याचा विचार सुरु केला होता. परंतु या लॉटरीमुळे, माझी चिंता काहीशी कमी झाली आहे. सध्या माझ्या डोक्यावर एक लाख दिरामचं (अंदाजे 20 लाख रुपये) कर्ज आहे. परंतु आता ही लॉटरी लागल्याने मी ते फेडू शकतो. या रकमेतून तो 27 हजार डॉलर्सच्या मदतीनं हे कर्ज फेडणार असून उर्वरित रक्कम तो बचत करणार आहे. चार जणांमध्ये ही रक्कम वाटली जाणार असल्याने त्याच्या वाट्याला 2 लाख अमेरिकी डॉलर इतकी रक्कम येणार आहे. डीडीएफ मिलेनियम मिलियनेअर ड्रॉमध्ये अनेक वेळा भारतीय नागरिकांचं नशीब फळफळलं आहे. सात कोटींचं मेगा प्राईझ जिंकणारा संजीवन हा 171 वा भारतीय ठरला आहे. या लॉटरीचं हे 37 वं वर्ष असल्याने त्यांनी आणखी एक विजेता घोषित केला असून यामध्ये युएई मधील अब्दाल्ला अल्तेनीजी यांना देखील लॉटरी लागली आहे. यापूर्वी देखील अनेक जणांना लॉटरी लागली आहे. खलीज टाइम्सच्या रिपोर्टनुसार, दुबईमधील 51 वर्षीय जॉर्ज जेकोब्स यांना देखील 12 मिलियन दिरहम म्हणजेच 24,11,07,390 भारतीय रुपयांची लॉटरी लागली होती. आर्थिक संकटांचा सामना करावा लागत असताना या लॉटरीमुळे खूप मदत होणार असल्याचं, जेकोब्स यांनी म्हटलं. मागील २ वर्षांपासून ते हे बिग तिकीट खरेदी करत असून यावर्षी 30 नोव्हेंबरला त्यांनी तिकीट खरेदी केलं होतं. दरम्यान, मिंटने दिलेल्या माहितीनुसार यापूर्वी मे महिन्यात मूळचे केरळमधील असणाऱ्या बिजनेसमॅनला देखील लॉटरी लागली होती. दुबई ड्युटी फ्रीमधून त्यांना लॉटरी लागली होती. एका राफेल लॉटरीची किंमत 500 दिरहम असून, 3 खरेदी केल्यास त्या 1 हजार दिराममध्ये मिळतात.
  Published by:Karishma
  First published:

  पुढील बातम्या