• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • माकडांनीही साजरा केला माणसांचा प्रेमाचा दिवस, Valentine’s Day ची खास ट्रीट, पाहा VIDEO

माकडांनीही साजरा केला माणसांचा प्रेमाचा दिवस, Valentine’s Day ची खास ट्रीट, पाहा VIDEO

लंडनमधील झेडएसएल या प्राणीसंग्रहालयात स्क्विरल मंकी या कुटुंबातील सात सदस्यांना व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा देत खास जेवणाची पॅकेट्स देण्यात आली आहेत. माकडांचा हा क्यूट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

 • Share this:
  लंडन, 13 फेब्रुवारी : सध्या जगभरात व्हॅलेंटाईन वीक सुरू आहे. अशात प्राण्यासाठीही खास व्हॅलेंटाईन स्पेशल तयारी केल्याचं एका प्राणीसंग्रहालयात समोर आलं आहे. लंडनमधील झेडएसएल या प्राणीसंग्रहालयात स्क्विरल मंकी या कुटुंबातील सात सदस्यांना व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा देत खास जेवणाची पॅकेट्स देण्यात आली आहेत. माकडांचा हा क्यूट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नऊ वर्षांचा नुका आणि त्याच्या सर्व Bolivian black-capped स्क्विरल माकडांना हार्ट शेप थीम असलेल्या खास बॅगमधून जेवण देण्यात आलं आहे. व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने त्यांना जेवणासाठी खास त्यांच्या आवडीचे mealworms देण्यात आले होते.

  (वाचा - एकाच वेळी तीन अभिनेत्रींसोबत साजरा केला Kiss Day; VIDEO सीसीटीव्हीमध्ये कैद)

  दरम्यान, व्हॅलेंटाईनसाठी विशेष करण्यात आलेल्या या थीम आणि जेवणावेळी प्रत्येक माकडासाठी प्रत्येकी एक-एक जेवणाची पिवशी असेल याकडेही प्राणीसंग्रहालयातील लोकांनी खास लक्ष ठेवलं होतं. जेणेकरून, एका जेवण्याच्या त्या आकर्षक पिशवीवरून त्यांच्यात भांडण होऊ नये.

  (वाचा - पाण्यात घुसूनच मगरीवर थेट अटॅक; शिकारीचा थरारक VIDEO)

  कोरोना व्हायरसमुळे सध्या लंडनमधील हे झेडएसएल (ZSL) प्राणीसंग्रहालय बंद आहे. तसंच प्राणीसंग्रहालय बंद असल्याने, कोणी येत नसल्याने प्राणीसंग्रहालयावर आर्थिक दबाव निर्माण झाल्याचं चित्र आहे. इंग्लंडच्या पूर्वेकडील व्हिप्सनाडे प्राणीसंग्रहालय चालवणाऱ्या, आंतरराष्ट्रीय संवर्धन चॅरिटीला कोरोना व्हायरस आणि लॉकडाउन काळात प्राणीसंग्रहालय कार्यरत राहण्यासाठी शक्य तितकी देणगी देण्याचं आवाहनही झेडएसएलने केलं आहे.
  Published by:Karishma
  First published: