जाहिरात
मराठी बातम्या / Viral / फिल्मी स्टाईलनं नवरीनं थांबवलं लग्न, मग प्रेमीची एन्ट्री आणि... नक्की काय आहे प्रकरण

फिल्मी स्टाईलनं नवरीनं थांबवलं लग्न, मग प्रेमीची एन्ट्री आणि... नक्की काय आहे प्रकरण

व्हायरल फोटो

व्हायरल फोटो

आई-वडिलांनी आपल्या मुलीची मनधरणी करण्याचा फार प्रयत्न केला. पण, तिनं ऐकलं नाही. शेवटी हताश वर नियोजित वधूला न घेताच वरात घेऊन माघारी परतला

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    प्रयागराज, 13 फेब्रुवारी : आजकाल लग्न सोहळ्यामध्ये चित्रपटांप्रमाणे नाट्यमय प्रकार घडत असल्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये असंच एक विचित्र प्रकरण पाहायला मिळालं. ज्यामध्ये, लग्नाच्या दिवशी वधूनं नियोजित वराशी लग्न न करता प्रियकराच्या गळ्यात वरमाळा घातली. सोशल मीडियावरही ही घटना चर्चेचा विषय ठरली आहे. वधूनं एकदम फिल्मी स्टाईलमध्ये वराच्यासोबत जाण्यास नकार दिला. आई-वडिलांनी आपल्या मुलीची मनधरणी करण्याचा फार प्रयत्न केला. पण, तिनं ऐकलं नाही. शेवटी हताश वर नियोजित वधूला न घेताच वरात घेऊन माघारी परतला. एवढंच नाही तर नववधू माहेरी किंवा सासरी जाण्याऐवजी लग्नात उपस्थित असलेल्या प्रियकराच्या गळ्यात माळ घालून त्याच्यासोबत गेली. हे ही पाहा : कार घेऊन थेट जिममध्ये घुसली महिला, ट्रेडमिलवरील व्यक्तीला धडकताच… Video Viral नैनी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील चाका येथे राहणाऱ्या तरुणीचं लग्न काझीपूर मोहल्ला येथे राहणाऱ्या तरुणाशी ठरलं होतं. 5 फेब्रुवारी रोजी साखरपुड्याचा समारंभ पार पडला होता. 8 फेब्रुवारी रोजी मेवालाल बगिया जवळील एका गेस्ट हाऊसमध्ये लग्न होणार होतं. लग्नाची मिरवणूक मोठ्या थाटामाटात आणि आनंदानं दाखल झाली होती. लग्नाचे काही विधीदेखील पार पडले. मात्र, अचानक नवरीनं लग्नाचे विधी पूर्ण करण्यास नकार दिला. हे समजताच लग्न सोहळ्यातील आनंदावर विरजण पडलं. फिल्मी स्टाईलनं मोडलं लग्न लग्न सोहळ्यातील एक-एक विधी पार पडत होता. अगोदर द्वारपूजा झाली आणि वरमाळा घालण्याचा विधीही पार पडला.दोन्ही बाजूंकडून एकमेकांना मानपानही करण्यात आला. रात्रीच्या शुभ मुहूर्तानुसार दीडच्या सुमारास लग्न होणार होतं. वैदिक मंत्रोच्चारात लग्नाला सुरुवात झाली. यादरम्यान वधू जागेवरून उठली आणि तिनं भटजींना थांबवलं. ऐनवेळी तिनं लग्न करण्यास नकार दिला. वधूच्या या वागण्यानं नवरदेव आणि उपस्थित सर्वजण थक्क झाले. मुरादाबादमध्ये ठिकठिकाणी लावले माकडाचे पोस्टर, या मागील कारण ऐकून वाटेल आश्चर्य हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं होतं. इन्स्पेक्टरनं सांगितलं की, दोन्ही पक्षांनी परस्पर संमतीनं लग्न रद्द केलं आहे. मुलगी प्रौढ आहे. त्यामुळे तिच्या संमतीशिवाय ती कोणाशीही लग्न करू शकत नाही. त्यामुळे पोलीस ठाण्यात याबाबत अधिकृत रेकॉर्ड तयार करण्यात आलेलं नाही. आजकाल लग्नाच्या दिवशी लग्न मोडण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जानेवारी महिन्यात फारुखाबाद जिल्ह्यातील मोहम्मदाबाद पोलीस स्टेशनच्या हद्दीत अशीच एक घडली होती. एका लग्नात द्वारपूजेच्यावेळी नवरदेवाला पैसे मोजता आले नाहीत म्हणून वधूच्या नातेवाईकांनी लग्नास नकार दिला होता. हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहचलं होतं. पण, शेवटी वरपक्षाला माघार घ्यावी लागली.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात