मुंबई, 11 फेब्रुवारी : व्हॅलेंटाइन वीक सुरू आहे. लव्हबर्ड्स एकमेकांसोबत ‘लव्ह वीक’ साजरा करत आहेत. तर सिंगल सोशल मीडियावर वेगवेगळे मीम्स शेअर करून हा आठवडा साजरा करत आहेत. पण आता अशाच सिंगल असलेल्यांसाठी एका तरुणीने भन्नाट ऑफर आणली आहे. ज्यामुळे सिंगल लोकांचाही व्हॅलेंटाईन डे अगदी उत्साहात जाईल. सिंगल लोकांना ऑफऱ देणाऱ्या या तरुणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एक मुलगी रस्त्याच्या कडेला दिसते आहे. एका गाडीवर ती पाणीपुरी विकते आहे. ही तरुणी बी-टेक झालेली आहे. बी-टेक पाणीपुरीवाली म्हणूनच तिला ओळखलं जातं. व्हिडीओत तुम्ही एका तरुणाचा आवाज ऐकला तर तोसुद्धा हेच सांगताना दिसतो. तो त्या तरुणीजवळ जातो आणि तिला 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डेसाठी काही ऑफऱ आहे का विचारतो. मी सिंगल आहे मला तुम्ही काय ऑफर द्याल, असं तो विचारतो. हे वाचा - अरुणसाठी वेडी झाली कतरिना! कोरोना काळात मैत्री, नंतर प्रेम आणि आता लग्न; पाहा PHOTO सुरुवातीला तरुणी गोंधळते. पण नंतर बोलता बोलातच ती सिंगल मुलांसाठी भन्नाट ऑफर काढते. तुम्ही पाणीपुरीची एक प्लेट घेतली तर तुम्हाला आणखी एक पाणीपुरी प्लेट फ्री. असं ती सांगते. म्हणजे एका प्लेटच्या पैशात तुम्ही दोन प्लेट पाणीपुरी खाऊ शकता. त्यावर तरुण तिला एका प्लेटमध्ये किती पाणीपुरी असतील? तरुणी त्याला सांगते सहा. त्यानंतर तो ही ऑफर फक्त माझ्यासाठी आहे का?, असंही विचारतो. यावर तरुणी म्हणून ही ऑफर सर्व सिंगल असलेल्यांसाठी आहे.
शेवटी तरुण तिला विचारतो जर मी माझ्यासोबत माझ्या मैत्रिणीला आणलं तर तर ती मुलगी म्हणते तुम्ही तुमची फ्री प्लेट तिला देऊ शकता.