Home /News /viral /

कसं होणार शिक्षणं? Online क्लाससमोरचं विद्यार्थ्याने केलं सेक्स; प्रोफेसरांना बसला धक्का

कसं होणार शिक्षणं? Online क्लाससमोरचं विद्यार्थ्याने केलं सेक्स; प्रोफेसरांना बसला धक्का

तिथं होत असलेला सगळा प्रकार त्याचे प्रोफेसर आणि इतर विद्यार्थांना दिसला. या संपूर्ण प्रकाराची एक व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली.

    व्हिएतनाम, 3 जुलै : कोरोनामुळे (COVID-19 pandemic) आपण घरात बंदिस्त झालोय त्यामुळे जीवनशैली पूर्णपणे बदलली आहे. वर्क फ्रॉम होम (work from home) आणि ऑनलाइन एज्युकेशन (online education) या नव्या संकल्पना आल्या आणि त्या आपल्यासाठी आता न्यू नॉर्मल झाल्या आहेत. जिथं सतत घरीच असल्यामुळे लोक वैतागले आहेत. तिथेच ऑनलाइन क्लास आणि वर्क फ्रॉम होमचे काही असे किस्से घडले जे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. असाच एक किस्सा आता व्हिएतनाममधून समोर आलाय. इथे एक विद्यार्थी ऑनलाइन क्लास सुरू असताना त्याच्या पार्टनरसोबत सेक्स करताना कॅमेऱ्यात कैद झाला. ही घटना व्हिएतनाममधील (Vietnam) हो ची मिन (Ho Chi Minh) नावाच्या शहरात घडली आहे. हा मुलगा ऑनलाइन क्लास सुरू असताना त्याच्या डिव्हाईसचा कॅमेरा बंद करायला विसरला होता. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, या मुलाचा ऑनलाइन क्लास सुरू (online class) होता. या दरम्यान तो त्याच्या पार्टनरसोबत सेक्स करत होता. मात्र, तो त्याच्या डिव्हाईसचा कॅमेरा बंद करायला विसरला त्यामुळे तिथं होत असलेला सगळा प्रकार त्याचे प्रोफेसर आणि इतर विद्यार्थांना दिसला. या संपूर्ण प्रकाराची एक व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. तर, हा प्रकार बघून त्याच्या प्रोफेसरला धक्का बसलाय. ते म्हणाले की शाळा-कॉलेजेसमध्ये मुलं त्यांच्या गर्लफ्रेंड्स (girlfriend) सोबत ‘मेक आउट’ करायचे मात्र, आता ऑनलाइन क्लास सुरू असतानाही असे प्रकार घडायला लागले आहेत. हे ही वाचा-आधी प्रेमाचं नाटक, मग अश्लील VIDEO कॉल करून करायची फसवणूक; तरुणीचं फुटलं बिंग दरम्यान, सेक्स करणारा मुलगा कॅमेरा बंद करण्यास विसरल्यामुळे त्याला तो काय करतोय हे बाकिच्यांना दिसतंय, याची कल्पना नव्हती. त्याचे प्रोफेसर त्याच्यावर ओरडल्यानंतर तो कॅमेरा बंद करण्यासाठी आणि कपडे घालण्यासाठी गेला. व्हिएतनाममधील माध्यमांनी याबद्दल माहिती देताना म्हटलंय की, या मुलाने त्याचे प्रोफेसर आणि क्लासमधील मित्रांना पत्र पाठवून माफी मागितली आहे. तर या संपूर्ण प्रकारानंतर विद्यापीठाने ऑनलाइन क्लासेस दरम्यान शिस्त पाळण्याच्या सूचना दिल्या आहेत. असाच एक प्रकार आपल्याकडेही घडला होता. श्वेता नावाच्या एका मुलीची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. यामध्ये ती माईक ऑफ न करताच एका मुलाने तिच्यासोबत शेअर केलेल्या खासगी गोष्टी दुसऱ्याला सांगत होती. यावेळी तिच्या मित्र-मैत्रिणींनी तिला माईक ऑन असल्याचं सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिला ते ऐकू न गेल्याने ती बोलतच राहिली. तिची ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर ती सोशल मीडियावर मीम टेम्प्लेट झाली होती.
    First published:

    Tags: Online crime, Sex

    पुढील बातम्या