मुंबई, 19 जानेवारी : पूर्वी शिक्षा म्हणून आरोपींना हत्तीच्या (elephant) पायाखाली दिलं जायचं. पण आता तर लोक हत्तीच्या पायाखाली स्वतःहून जाताना दिसत आहेत आणि तेदेखील मसाज करण्यासाठी. हो बरोबर वाचलं तुम्ही हत्तीच्या पायानं मसाज (massage by elephant) अवाढव्या हत्तीच्या पायाखाली येणं ही कल्पनाही करवत नाही तिथं लोक त्याच्या पायानं मसाज करून घेत आहेत. सध्या सोशल मीडियावर (social media) हत्ती मसाज करत असल्याचा व्हिडीओ (video) व्हायरल (viral) होतो आहे.
एका महिलेनं हत्तीकडून मसाज करून घेतला आहे. @amir2371360 ट्विटर युझरनं हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. हत्ती माणसाचा मसाज करू शकतो हा विचारही आपण कधी केला नसेल, ते प्रत्यक्षात तुम्ही या व्हिडीओत पाहू शकता.
व्हिडीओत दिसतंय की एक महिला पोटावर झोपली आहे आणि तिच्या शेजारी हत्ती आहे. हत्ती तिला आधी सोंडनं मसाज करतो. अगदी पायापासून ते तिच्या डोक्यापर्यंत सोंडेनं तिला मसाज देतो. त्यानंतर आपला एक पाय वर करून तो तिच्या पाठीवर ठेवतो आणि हलका दाब देत राहतो.
विशेष म्हणजे माणूसही नसावा इतका हा हत्ती हुश्शार आहे. कारण आपला पाय किती जड आहे आणि त्यानं एखाद्या माणसाचा मसाज करताना किती दाब द्यावा याची पुरेपूर माहिती त्याला आहे. अगदी सावधपणे तो मालिश करताना दिसतो आहे.
A spa in Cairo is offering snake massages for relieving muscle pain and soothing joints pic.twitter.com/XMCUmjQhPo
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही जणांना हत्तीला मसाज करताना पाहून खूपच छान वाटलं आहे. हत्तीच्या या कौशल्याचं त्यांनी कौतुक केलं आहे. तर काही जणांनी हत्तीला असं मसाज करायला लावल्यानं टीकाही केली आहे. हत्ती म्हणजे माणसांचा नोकर नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
इजिप्तमध्ये एक कैरो स्पा (Cairo spa) आहे इथं स्नेक मसाज घेण्यासाठी लोकांची रांग लागते. स्पाचे मालक सफवत सेदकी यांनी सांगितल्यानुसार, स्नेक मसाज मांसपेशी आणि सांध्यांचं दुखणं कमी करण्यासाठी खूप फायद्याचा असतो. सोबतच रक्तप्रवाह सुरळीत करण्यासाठी हा मसाज मदत करतो.