मोगा, 18 जानेवारी : माणसानं मुक्या जनावरांवर केलेली हिंसा (violence) अनेक प्रकरणांमध्ये समोर येत असते. पंजाबमध्ये (Punjab) मोगा इथं एक असाच प्रकार घडला आहे. एका कुत्र्याचा लोकांनी अतोनात छळ करत त्याचा जीवच घेतला. हे सगळं दृश्य कैमेऱ्यात शूट करून कुणीतरी सोशल मीडियावरही शेअर केलं आहे.
कुत्र्याच्या या छळाची (harassment) गोष्ट आणि व्हीडिओ सोशल मीडियावर (social media) व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हीडिओमध्ये (viral video) स्पष्ट दिसतं आहे, की 2 व्यक्ती दिवसाढवळ्या रस्त्यावर हे क्रूर कृत्य करत आहेत. व्हिडीओमध्ये दिसत आहे, की या दोघांच्या हातात काठ्या आहेत. रस्त्यावर या दोघांनी कुत्र्याला पूर्णपणे घेरलं आहे. यानंतर त्या कुत्र्याचा अगदी जीव जाईपर्यंत (dead) त्याला मारहाण केली गेली.
कुत्रा खूप वेळ ओरडत होता. मात्र या दोन्ही तरुणांना त्याची अजिबातच दया आली नाही. या क्रौर्यादरम्यान एक तरुण रस्त्यावरून तिकडं येऊ पाहणाऱ्यांना रोखून धरतानाही दिसतो आहे. या दोघांनी मिळून तोवर कुत्र्याला इतकं मारलं, की तोवर त्याचा मृत्यू झाला. 24 सेकंदांच्या या व्हिडिओत भयानक क्रौर्य (brutality) भरलेलं आहे.
या भयंकर क्रौर्याचा व्हीडिओ व्हायरल झाल्यावर पोलिसांनी (police) कारवाई करायचा निर्णय घेतला. दोन्ही आरोपीची ओळख पटली असून परविंदर सिंह आणि कुलदीप सिंह लखाना अशी त्यांची नावं आहेत. सांगितलं जात आहे, की दोघं दशमेश नगर इथल्या एका गुरुद्वाऱ्यात काम करतात. परविंदर सिंह हा मोगा इथल्या शहीद भगत सिंह नगरचा राहणारा आहे. कुलदीप मूळचा तरन तारन जिल्ह्याचा रहिवासी आहे.
आता या प्रकरणी दोघांवरही भारतीय दंड संहितेनुसार (Indian penal code) कलम 429 आणि पशू क्रूरता निवारण अधिनियम 1960 च्या कलम 11 नुसार केस दाखल केली गेली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Dog, Pet animal, Punjab, Viral video.