या डान्स एक्सपरिमेंट रुग्णाची फक्त शारीरिकच नव्हे तर मानसिक आरोग्यही सुधारलं आहे, असं रुग्णालय प्रशासनाने सांगितलं. श्रीनिवास जसा या एक्स्परिमेंटला पॉझिटिव्ह प्रतिसाद देऊ लागला. तसं त्याला आयसीयूमधून जनरल वॉर्डमध्ये हसवण्यात आलं. श्रीनिवासवर आता फिझियोथेरेपी सुरू आहे. यामुळे तो लवकरात लवकर बरा होईल असा आशेचा किरण त्याच्या कुटुंबाला दिसला आहे. हे वाचा - मुंबईत आढळलेल्या भारतातील पहिल्या XE Variant Patient काय आहे अवस्था? दरम्यान नर्सच्या डान्सने बरा झालेला हा पहिला रुग्ण नाही. याआधी सामाजिक कार्यकर्त्या नंदिनी वेंकटाद्री यांनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवर एका रुग्णालयातील हा व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यातही एक नर्स रुग्णासमोर अशीच डान्स करत होती.तेलंगणाच्या रुग्णालयातील नर्सचा रुग्णावर अनोखा प्रयोग; फक्त डान्स पाहून बरा झाला रुग्ण. pic.twitter.com/uYA0L614W1
— News18Lokmat (@News18lokmat) April 6, 2022
व्हिडीओत पाहू शकता एक लकवाग्रस्त रुग्ण (Paralytic Patient) बेडवर झोपलेला आहे. त्याच्या शेजारी दोन नर्स उभ्या आहेत. या नर्स त्याला फिजिओथेरेपी देताना दिसत आहेत (Physiotherapy Exercise Video). पॅरालिसिस रुग्णाकडून त्या एक्सरसाईझ करवून घेत आहेत. पण ही थेरेपी त्याला वेगळ्या पद्धतीने दिली जात होती. हे वाचा - कसं शक्य आहे! किडनी इन्फेक्शनवर उपचार करायला गेली महिला आणि अचानक जन्माला आलं बाळ लकवाग्रस्त रुग्णाच्या शरीराची हालचाल व्हावी म्हणून नर्सने मोठ्या आवाजात गाणं लावलं आणि स्वतः डान्स करून लागली तिला पाहून रुग्णाच्या अंगात संचारलं. अंथरूणातच रुग्णही तिला पाहून थिरकू लागला. जो रुग्ण आपलं शरीर हलवूही शकत नव्हता. तो चक्क डान्स करू लागला. आनंदाने आपले हात हलवत होता. त्याच्या चेहऱ्यावर आनंदही झळकत होता.This clever nurse was giving her paralytic patient some physiotherapy exercises..and did this dance number to make him be in high spirits . She extracted co-operation and we can see his smile and joy doing those exercises . 👏🏼👏🏼👏🏼 pic.twitter.com/ZG17VOfB34
— Nandini Venkatadri🇮🇳 (@NandiniVenkate3) January 23, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.