जाहिरात
मराठी बातम्या / Viral / हॉटेलच्या किचनमध्येच कर्मचारी करत होता आंघोळ, VIDEO VIRAL झाला आणि...

हॉटेलच्या किचनमध्येच कर्मचारी करत होता आंघोळ, VIDEO VIRAL झाला आणि...

हॉटेलच्या किचनमध्येच कर्मचारी करत होता आंघोळ, VIDEO VIRAL झाला आणि...

हॉटेलमध्ये जेवण्याआधी कशा परिस्थितीत जेवण केले जाते, हे दाखवणारा हा व्हायरल VIDEO एकदा बघाच.

  • -MIN READ
  • Last Updated :

न्यूयॉर्क, 17 फेब्रुवारी : गेल्या काही दिवसांपासून फेसबूकवर एक व्हिडिओ व्हायरल होत होता. या व्हायरल व्हिडिओमध्ये एका मोठ्या हॉटेलचा कर्मचारी किचनमध्येच आंघोळ करताना दिसत होता. काही क्षणातच हा व्हिडिओ व्हायरल झाला. इंग्रजी वृत्तांनी दिलेल्या माहितीनुसार,आंघोळ करणारा हा कर्मचारी वेंडी या प्रसिद्ध हॉटेलमध्ये काम करत होता. हा व्हिडिओ पहिल्यांदा फेसबुकवर कॉर्नर सॉमरफिल्ड या युझरने " मी सर्वांना सांगणार आहे की ग्रीनव्हिले वेंडी या हॉटेलमध्ये जाऊ नका”, असे कॅप्शन दिले. हा व्हिडिओ सगळ्यात आधी टिक टॉकवर व्हायरल झाला होता. त्यानंतर फेसबुकवर शेअर करण्यात आला. वाचा- VIDEO : 8 वर्षांची चिमुरडी झाली 80 वर्षांची, ‘या’ भयंकर आजारामुळे झाला मृत्यू या व्हायरल व्हिडिओमध्ये एक कर्मचारी किचनमधील मोठ्या सिंकमध्ये हॉटेलमधल्या कपड्यातच आंघोळ करताना दिसत आहे. सिंकमध्ये बसलेला हा कर्मचारी हसतानाही या व्हिडिओमध्ये दिसत आहे. व्हिडिओ व्हायरल होताच लोकांनी रेस्टॉरंटच्या अस्वच्छतेवर प्रश्नचिन्ह उभे केले आणि त्यांच्या प्रतिक्रियांनी सोशल मीडियावर पूर आला. वाचा- VIDEO : ट्रकमधून फिरताना हत्तीला दिसला ऊस अन् रस्त्यातच घेतला लंच ब्रेक

वाचा- VIDEO : खरं प्रेम! दोघांनीही कोरोना, सलाइन लावलेल्या अवस्थेतही पत्नीला भरवले घास एका युझरने, “व्वा, मला खात्री आहे की तुमच्या पालकांना तुमचा अभिमान वाटत असेल. मात्र हे तुमच्या ग्राहकांसाठी अत्यंत वाईट आहे, असे कॅप्शन लिहिले आहे. तर, दुसऱ्या एका युझरने, “मी एका रेस्टॉरंटमध्ये काम करतो, मॅनेजर कुठे होता? किळसवाणा, नोकरीवरून काढून टाकण्याची गरज आहे, मॅनेजरलाही!!”, अशी कमेंट रागात केली आहे. फेसबुकवर अपलोड करण्यात आलेला हा व्हिडिओ 2 लाख लोकांनी पाहिला आहे तर, 2 हजारहून अधिक लोकांनी शेअर केला आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात अमेरिकेच्या फ्लोरिडामधील वेंडी हॉटेलमध्ये अशीच एक घटना घडली होती, त्यामुळं आता या कर्मचाऱ्यावर कारवाई होणार का, हे पाहावे लागणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात