वुहान, 16 फेब्रुवारी : जगभरात कोरोनाची दहशत पसरली आहे. चिनमध्ये कोरोना व्हायरसची लागण झाल्याने मृतांचे प्रमाण वाढत चालले आहे. हा व्हायरस वेगाने पसरत असल्यानं भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये एका वृद्ध दाम्पत्याचा डोळ्यात पाणी आणणारा व्हिडिओ शेअर केला जात आहे. यामध्ये 87 वर्षीय व्यक्ती कोरोना व्हायरसने ग्रस्त असलेल्या पत्नीला जेवणाचे घास भरवताना दिसत आहे. तो स्वत:ही कोरोनाने ग्रस्त आहे. पीपल्स डेली चायनाने ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. 12 फेब्रुवारीला हा व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. याला कॅप्शन देताना म्हटलं आहे की, माझं नेहमीच तुझ्यावर प्रेम असेल. कोरोना व्हायरसने ग्रस्त असलेल्या 87 वर्षीय व्यक्तीला सलाइन लावलेलं आहे. तशाही अवस्थेत तो पत्नीला भेटण्यासाटी पोहोचला. तिथं त्याने पत्नीला घास भरवले. पत्नीशी बोलताना तिला धीरही दिला आणि तु लवकर ठिक होशील असं म्हटलं. एका युजरने हा व्हिडिओ शेअर करताना म्हटलं की, हे खरं प्रेम आहे. दोघेही लवकर ठीक व्हावेत अशी प्रार्थना. दुसऱ्या एकाने म्हटलं की, खूपच भावूक करणारं आणि डोळ्यात पाणी आणणारं दृश्य आहे. लवकर बरे व्हा.
I’ll love you forever, every single day of forever: An 87-yr-old man diagnosed with #COVID19 held an infusion bottle to visit his wife, also a #COVID19 patient, from the ward next door and patiently gave her water and food. Hope you recover soon! pic.twitter.com/LXH1AxINsU
— People's Daily, China (@PDChina) February 12, 2020
कोरोना व्हायरसमुळे (Corona) चीनमध्ये हा:हाकार माजला आहे. कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे आतापर्यंत तब्बल 1600 जणांचा मृत्यू झाला असून 68 हजार लोकांना याची बाधा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. डिसेंबरपासून कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याशिवाय चीनच्या राष्ट्रीय आरोग्य विभागाने आणखी 2009 रुग्णांना बाधा झाल्याचे सांगितले आहे. हुबेई प्रांताची राजधानी वुहानमध्ये 1,843 नवी प्रकरणं समोर आली आहेत. खरं की खोटं! चीनमध्ये कोरोना झालेल्यांना गोळी मारून केलं जातंय ठार? चीनच्या सरकारी समाचार एजन्सी शिन्हुआच्या बातमीनुसार शनिवारी ज्या 142 लोकांचा मृत्यू झाला त्यापैकी 139 हुबेईमध्ये सिचुआनमध्ये 2 आणि हुनानमध्ये 1 व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 9,419 संक्रमित रुग्णांवर उपचार करुन त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यातही कोरोनाचा आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांवर गंभीर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत 1,700हून अधिक चीनच्या आरोग्य अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. वाचा : अखेर चीनला Coronavirus वर इलाज मिळाला, काय आहे सत्य?

)







