Home /News /viral /

UPSC Result : राहुल मोदी आणि 420 हे शब्द दिवसभर का होतायत ट्रेंड?

UPSC Result : राहुल मोदी आणि 420 हे शब्द दिवसभर का होतायत ट्रेंड?

UPSC 2019 ला झालेल्या अंतिम परीक्षेचा निकाल मंगळवारी दुपारी जाहीर झाला त्यानंतर थोड्याच वेळात राहुल, मोदी आणि 420 हे शब्द ट्रेंड व्हायला लागले.

    नवी दिल्ली, 4 ऑगस्ट : आजकाल कुठलीही ब्रेकिंग बातमी सोशल मीडियावर झटक्यात ट्रेंड होते. चर्चेत असलेले विषय तर दिवसभर सोशल मीडियावर Trends च्या रूपात फिरत राहतात. UPSC 2019 ला झालेल्या अंतिम परीक्षेचा निकाल मंगळवारी दुपारी जाहीर झाला त्यानंतर थोड्याच वेळात राहुल, मोदी आणि 420 हे शब्द ट्रेंड व्हायला लागले. काय आहे ही गंमत आणि नेमकं कुणामुळे हा ट्रेंड निर्माण झाला? राहुल गांधी किंवा नरेंद्र मोदी यांच्याविषयी कुठलीही बातमी नवी नसूनही राहुल मोदी हे नाव चर्चेत होतं आणि व 420 हा आकडाही. काय आहे गौडबंगाल. त्याचं झालं असं की, UPSC Civil Services च्या मुख्य परीक्षेचे निकाल जाहीर झाले. कोण टॉपर कुणाला कुठली रँक हे लगेचच प्रसिद्ध झालं. सोशल मीडियावर सगळी मेरिट लिस्ट फिरायला लागली. या रँक होल्डर्सच्या मेरिट लिस्टमध्ये एक नाव लक्षवेधी होतं - राहुल मोदी. या राहुल मोदीला UPSC च्या परीक्षेत देशभरात 420 वी रँक मिळाली आहे. त्यामुळे अर्थातच नेटकऱ्यांना खिल्ली उडवायला एक कारण मिळालं. दोन नामवंत राजकारणी आणि त्यातून 420 वी रँक असं कॉम्बिनेशन आल्यामुळे UPSC च्या परीक्षेत देशात पहिल्या आलेल्या प्रदीप सिंह इतकाच 420 वा आलेला राहुल मोदीसुद्धा चर्चेत राहिला. UPSC 2019 च्या अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून त्यात प्रदीप सिंह देशात पहिला आला आहे. UPSC civil Service साठी झालेल्या या परीक्षेत देशभरातून 829 महत्त्वाकांक्षी युवक युवती निवडले गेले आहेत. जतीन किशोर आण प्रतिभा वर्मा अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. महाराष्ट्राची नेहा भोसले देशात पंधराव्या रँकवर आहे. अभिषेक सराफ आठव्या रँकवर आहे.UPSC 2019 चा निकाल www.upsc.gov.in या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. UPSCने सप्टेंबर 2019 मध्ये घेण्यात आलेल्या नागरी सेवांच्या लेखी परीक्षेच्या निकालांच्या आधारे आणि फेब्रुवारी-ऑगस्ट 2020 मध्ये घेण्यात आलेल्या वैयक्तिक मुलाखतीवर आधारित निवडलेल्या उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली आहे.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Narendra modi, Rahul gandi, Upsc

    पुढील बातम्या