मराठी बातम्या /बातम्या /Viral /Shocking Video! सापासोबत मस्ती तरुणाला पडली भारी; शेपटी धरताच Private part ला केला दंश

Shocking Video! सापासोबत मस्ती तरुणाला पडली भारी; शेपटी धरताच Private part ला केला दंश

सापाने तरुणावर केला खतरनाक हल्ला.

सापाने तरुणावर केला खतरनाक हल्ला.

सापाने तरुणावर केला खतरनाक हल्ला.

मुंबई, 30 डिसेंबर : साप (Snake video) ज्याचं नाव ऐकूनच बहुतेकांना घाम फुटतो. पण असे काही लोकही आहेत, ज्यांना साप म्हणजे एखादं खेळणंच वाटतं. काही लोक सापासोबत मस्ती करताना, त्याच्याशी जीवघेणे खेळ खेळताना दिसतात. सोशल मीडियावर सापाचे असे बरेच व्हिडीओ व्हायरल होत असतात (Snake video attack video) . आता असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात सापाने तरुणाला नको त्या ठिकाणी दंश केला आहे (Snake bite man's private part).

सापासोबतची मस्ती तरुणीला चांगलीच महागात पडली आहे. आपल्यासोबत असं काही होईल याचा स्वप्नातही या तरुणाने विचार केला नसेल. या तरुणाला सापाने दंश केला तो केला पण अशा जागेवर केला ज्यामुळे त्याची बोलतीच बंद झाली. सहनही होईना आणि बोलवेना अशीच अवस्था या तरुणाची झाली. तसं सापाने दंश करणं ही गंभीर घटना पण हा व्हिडीओ पाहून तुम्हाला हसूही आवरणार नाही.

हे वाचा - तरुणाची भलतीच डेअरिंग! भुकेल्या चित्त्याची शिकार हिसकावली; पुढे काय घडलं पाहा

व्हिडीओत पाहू शकता एका व्यक्तीने सापाला हातात धरलं आहे. सापाची शेपटी हातात धरून तो आपले करतब दाखवतो आहे. त्याचवेळी साप त्याचा दंश करण्याचा प्रयत्न करत असतो. कशीबशी ही व्यक्ती तेव्हा सापाच्या दंशापासून आपला बचाव करते. सापाच्या शेपटीला धरून  त्याला दूर फेकते. साप जमिनीवर कोसळतो.

त्यानंतर तरुणासमोर फणा काढून उभा राहतो. तरुण त्या सापाला पुन्हा धरायला जातो तेव्हा मात्र साप आक्रमक होतो. तो हवेत झेपावत तरुणाच्या दिशेने येतो. उडी मारून हल्ला करतो तो थेट त्याच्या प्रायव्हेट पार्टवरच. तरुणाच्या प्रायव्हेट पार्टला तो लटकलेला दिसतो. कदाचित तो दंशही करतो. तरुणाला वेदना होतात आणि तो मोठमोठ्याने ओरडू लागते.

1dangerous_indian नावाच्या इन्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहे.

First published:
top videos

    Tags: PRIVATE part, Snake, Snake video, Viral, Viral videos