लंडन, 07 नोव्हेंबर : हल्ली बऱ्याच लोकांचं सोशल मीडिया अकाऊंट आहे. सोशल मीडियावर आपले फोटो, व्हिडीओ पोस्ट करणं हा तर काही लोकांचा दिनक्रम तर काहींचा कमाईचा मार्गच तो आहे. पण सोशल मीडियाचे जितके फायदे तितकेच तोटेही आहेत. सोशल मीडियामार्फत फसवणुकीचे प्रकार तुम्हाला माहिती असतील. पण एका महिलेला सोशल मी़डियाचा असा फटका बसला आहे, ज्याचा तुम्ही विचारही केला नसेल. सतत सोशल मीडिया वापरणाऱ्या या महिलेची इतकी भयानक अवस्था झाली की तिला तिचा मृत्यूच दिसू लागला.
यूकेच्या वोर्सेस्टरमध्ये राहणारी 29 वर्षांची फेनेलो फॉक्स. एक अडल्ट कंटेन्ट क्रिएटर आहे. अडल्ट साइट्सच्या माध्यमातून तिने 9 कोटी रुपये कमवले आहेत. पण आता याच सोशल मीडियामुळे तिची अवस्था भयंकर झाली आहे.
कोरोना महासाथ आणि लॉकडाऊनच्या सुरुवातीपासून तिने सोशल मीडियाचा वापर वाढवला होता. दर दिवसाला 14 तास ती फोनवर राहायची. यामुळे तिला आता वर्टिगोची समस्या झाली आहे. यात चक्कर येते, तीव्र डोकेदुखी होते, ताप येतो, डोळ्यांची दृष्टी कमजोर होते.
हे वाचा - पुरुषांचा प्रामाणिकपणा तपासण्याची नोकरी; येथे सुंदर स्त्रिया होतात मालामाल
सोशल मीडियावर फोटो, व्हिडीओ पोस्ट करणं, नेटिझन्सच्या प्रश्नांची उत्तर देणंही तिला कठीण झालं होतं. याला खूप वेळ जात होता. फेनेलाला यामुळे इतका स्ट्रेसही झाला की तिला हृदयाची समस्याही बळावली. यामुळे तिला कित्येक महिने नीट चालता-फिरताही येत नव्हतं. वर्टिगोमुळे तिला इतक्या वेदना होत होत्या की तिला व्हिलचेअरचा आधार घ्यावा लागला. डॉक्टरांनी तिला काम सोडून आराम करण्याचा सल्ला दिला. डेली स्टारशी बोलताना तिने सांगितलं की एक वेळ अशी होती की तिला वाटलं आता माझा मृत्यू होईल.
हे वाचा - बापरे! हटके करण्याच्या नादात फेमस सुपरमॉडेलचा झाला 'कीडा'; जमिनीवर रेंगतानाचा VIDEO VIRAL
लॉकडाऊनमध्ये तिची कमाई जास्त होती पण आता ती कमी झाली आहे. आता तिला फोनवर जास्त वेळ घालवता येत नाही आहे. 10 तासांपेक्षा जास्त वेळ ती सोशल मीडियावर राहिली तर तिच्या शरीरात वेदना होऊ लागतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.