वॉशिंग्टन, 03 नोव्हेंबर : पार्टी असो वा एखादा सोहळा त्यात आपण सर्वांपेक्षा हटके दिसायला हवं असं प्रत्येकाला वाटतं. सेलिब्रिटी आणि मॉडेलच्या याच लूककडे सर्वांचं लक्ष असतं. सध्या बऱ्याच देशात हॅलोविन सेलिब्रेशन होतं आहे. यात काहीतरी हटके करण्याचा प्रयत्न अनेकांचा आहे. एका प्रसिद्ध मॉडेलनेही हॅलोविनसाठी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला. या नादात तिचा कीडा झाला आहे. मॉडेल चक्क कीडा बनवली. तिचा जमिनीवर रेंगतानाचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
प्रसिद्ध अमेरिकन-जर्मन सुपरमॉडेल हैदी क्लमच्या या व्हिडीओमुळे सर्वांना धक्का बसला आहे. सुंदर दिसणारी हैदी अचानक कीडा बनली. तिचा व्हिडीओ पाहूनच तुमच्या अंगावर अक्षरशः काटा येईल. तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर आपले हे व्हिडीओ आणि फोटोही पोस्ट केले आहेत.
हे वाचा - मिस अर्जेंटिना आणि मिस प्युअर्टो रिको अडकल्या लग्नबंधनात; इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक भलामोठा कीडा दिसतो आहे. हा कीडा जमिनीवर रेंगतानाही दिसतो आहे. हा कीडा म्हणजे दुसरं तिसरं कुणी नाही तर मॉडेल हैदी आहे. तुम्हाला पाहूनच धक्का बसला असेल.
आता हेदी खरोखर कीडा बनली नाही, म्हणजे तिने तसा गेटअप केला आहे. तिने कीड्यासारखा दिसणारा ड्रेस घातला आहे. ज्यामधून तिचा चेहराही दिसत नाही आहे. तुम्ही नीट निरखून पाहिलं तरच तिचे डोळे, नाक आणि तोंड दिसतं. खरंतर हा कीडा पाहून ती एखादी व्यक्ती असावी यावरही विश्वास बसत नाही. हा खरा मोठा कीडाच वाटतो आहे.
हे वाचा - VIDEO - ती ढसाढसा रडत होती तरी तिचे हातपाय धरून तिला...; नवरीसोबत मंडपात धक्कादायक प्रकार
आपल्यालाही काहीतरी वेगळं करायचं होतं आणि हा गेटअप मला मजेशीर वाटला, असं हेदी म्हणाली. या विचित्र गेटअपसाठी किती मेहनत करावी लागली, हेसुद्धा हेदीने सांगितलं आहे.
View this post on Instagram
हैदीचा हा विचित्र लूक तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन आम्हाला नक्की सांगा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Model, Viral, Viral videos