नवी दिल्ली, 4 नोव्हेंबर : सरकारी नोकरी, व्यवसाय किंवा खासगी क्षेत्रातली नोकरी अशा पारंपरिक पद्धतीच्या रोजगारांचे दिवस आता गेले. आता रोजगाराच्या त्याहूनही अनेक संधी उपलब्ध होत आहेत. पैसे मिळवण्याचे अनेक पर्याय खूप जण शोधू लागले आहेत. काही वेगळं करण्याचा आनंद व पैसा दोन्ही मिळेल या दृष्टीनं अनेक जण प्रयत्न करत आहेत. ब्राझीलमध्ये अशाच प्रकारची नोकरीची संधी सुंदर स्त्रियांसाठी उपलब्ध करून दिली जात आहे. पुरुषांचा प्रामाणिकपणा आणि एकनिष्ठता तपासण्याचं काम या नोकरीत करायचं असून, यात कष्ट कमी आणि पैसे जास्त मिळत आहेत.
ब्राझीलमध्ये लॉयल्टी इन्स्पेक्टर्स या जॉबची सध्या खूप चर्चा आहे. एखाद्या क्लायंटच्या पार्टनरचा प्रामाणिकपणा तपासण्यासाठी सुंदर स्त्रियांना ही नोकरी दिली जात आहे. या नोकरीमधून महिलांना लाखो रुपये कमावता येतात. बेरोजगार तरुणींना थोडे पैसे यातून निश्चितच कमावता येतील.
लॉयल्टी इन्स्पेक्टरची ही नोकरी टिकटॉक आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातून दिली जात आहे. सुंदर आणि तरुण महिलांना या नोकरीची संधी उपलब्ध असते. एखाद्या व्यक्तीची प्रेयसी किंवा बायकोकडून अशा सुंदर स्त्रियांना नोकरी दिली जाते. सांगितलेल्या व्यक्तीशी जवळीक वाढवून त्याचे मेसेज, फोटो किंवा चॅट नोकरी देणाऱ्या महिलेला ती महिला पाठवते. यात आपला प्रियकर किंवा नवरा संबंधित तरुणीत गुंततो का, तिच्याशी जवळीक वाढवण्याचे प्रयत्न करतो का, या गोष्टी तपासल्या जातात. एका 22 वर्षीय तरुणीने UOL’s Universa ला सांगितलं, की प्रसूतीनंतर तिच्याकडे काहीही काम नव्हतं. तेव्हा तिच्याकडे या नोकरीची संधी आली. तिने पहिल्यांदाच अशा प्रकारचं काम केलं होतं. त्या कामाबाबत सोशल मीडियावर पोस्ट केल्यावर तिला तशा नोकरीच्या आणखीही संधी चालून आल्या.
बिअर पिऊन तरुणाने गर्लफ्रेंडसोबत ठेवले संबंध... पण त्यानंतर असं काही घडलं की तरुणीने गमावला जीव
या नोकरीमध्ये ऑनलाइन माध्यमातूनच पुरुषांची परीक्षा घेतली जाते. या माध्यमातून 45 हजार ते 1 लाख रुपये कमावता येऊ शकतात. काही स्त्रिया व्यावसायिकाप्रमाणे यात काम करत आहेत. त्यांच्या मते 10 पैकी 8 पुरुष या परीक्षेत नापास होतात; मात्र काही वेळेला हे त्या स्त्रियांसाठी घातक ठरतं.
पैसे कशातून कमावता येतील याचे शोध गेल्या काही काळात लागू लागले आहेत. सामान्य व्यक्तीला ज्यात पैसे कमावण्याची संधी दिसत नाही, त्यातून पैसे कमावण्याच्या कल्पना काही सुपीक डोक्याच्या व्यक्तींना सुचतात. लोकांच्या गरजाही वाढल्यात. त्यामुळे त्या गरजा ओळखून त्यांचं संधीत रूपांतर करणारेही वाढलेत. पुरुषांच्या प्रामाणिकपणाबाबत कायमच शंका घेतली जाते. पत्नी किंवा प्रेयसीसाठी तर पुरुषांचा प्रामाणिकपणा खूप महत्त्वाचा ठरतो. त्यांची ही गरज ओळखून यातून पैसे कमावण्याची शक्कल लढवण्यात आली आहे. अर्थात केवळ यावरून त्यांना तपासणं योग्य ठरणार नाही; मात्र स्त्रियांसाठी ही पैसे कमावण्याची संधी ठरली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.