जाहिरात
मराठी बातम्या / Viral / बापरे! UFO की आणखी काही? VIRAL VIDEO पाहून सर्वांना भरली धडकी; इथं पाहा त्याचं सत्य

बापरे! UFO की आणखी काही? VIRAL VIDEO पाहून सर्वांना भरली धडकी; इथं पाहा त्याचं सत्य

बापरे! UFO की आणखी काही? VIRAL VIDEO पाहून सर्वांना भरली धडकी; इथं पाहा त्याचं सत्य

आकाशात दिसेलल्या उडत्या तबकडीसारख्या या विचित्र दृश्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

    मुंबई, 21 जानेवारी :  सोशल मीडिया वर काही ना काही व्हायरल होत असतात. अशाच एका व्हायरल व्हिडीओ ने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. किंबहुना हा व्हिडीओ पाहून अनेकांना धडकी भरली आहे. कारण आकाशात असं काही दिसलं आहे, की हे काय आहे आणि काय नाही, अशी भीती सर्वांना वाटू लागली आहे. धक्कादायक म्हणजे त्याचा आकार उडती तबकडी ज्याला UFO म्हणतात, अगदी तसाच आहे. त्यात एलियन पृथ्वीवर येणार असे दावे केले जात असल्याने आकाशातील हे दृश्य पाहिल्यानंतर सर्वांच्या काळजात धस्सं झालं आहे. पण हे खरंच UFO आहे की आणखी काही? आजवर आकाशात अशा उडत्या तबकड्या पाहिल्याचे दावे अनेकांनी केले आहेत. असे व्हिडीओही समोर आले आहेत. पण हा व्हिडीओ जरा जास्तच भीतीदायक आहे. व्हिडीओ तुम्ही नीट पाहिला तर अगदी फिल्ममध्ये आकाशातून उडत्या तबकडीतून एलियन येतात अगदी तशाच आकाराचं हे काहीतरी दिसतं आहे. त्यामुळे हा UFO आहे, असं अनेकांना वाटलं. खरंतर व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही काही क्षण तसंच वाटेल. पण याचं सत्य मात्र वेगळंच आहे. हे वाचा -  Artificial Light : प्रकाश प्रदूषणाचा वेग वाढतोय, वेळीच सावध व्हा, अन्यथा… या घटनेचा व्हिडीओ @TansuYegen नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला दिलेल्या कॅप्शममध्ये हे अनोख दृश्य तुर्कीमधील बुर्सा या ठिकाणचं असल्याचं सांगण्यात आलं आहे. गुरुवारी सूर्योदयावेळी हे दृश्य दिसलं जे एक तासभर दिसत होतं.

    News18लोकमत
    News18लोकमत

    तुम्हाला आश्चर्य वाटेल पण UFO किंवा दुसरं तिसरं काही नाही तर चक्क ढग आहेत. हो बरोबर वाचलंत ढग. तसे आकाशात ढगांचे वेगवेगळे आकार तयार होत असतात. तुम्हीसुद्धा कधी ना कधी ढगांमध्ये असा आकार शोधला असेल. पण असे ढग आजवर कदाचित कधीच पाहिले नसतील.यूएफओ आकाराचा एक महाकाय आणि अविश्वसनीय असा ढग. सूर्यकिरणांमुळे या ढगांना एक वेगळाच रंग मिळाला आहे. तुर्कीच्या हवामान विभागाने दिलेल्या  माहितीनुसार हे लेंटिकुलर क्लाऊड आहेत. जे आपल्या गोलाकार, उडत्या तबकडीसारख्या आकारासाठी ओळखले जातात. सामान्यपणे हे 2 हजार ते 5 हजार मीटर उंचावर दिसतात. हे वाचा -  जगातील सर्वात खतरनाक झाड! स्पर्श करताच जीव नकोसा होईल; चुकूनही हात लावू नका पण प्रत्येकासाठी हे अद्भुत दृश्य आहे. त्यामुळे लोकांनी ते आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केलं आणि सोशल मीडियावर पोस्ट केलं. ज्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

    जाहिरात

    तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन आम्हाला नक्की सांगा.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात