सोशल मीडियावर (Social Media) एका गायीचा (Cow) व्हिडिओ व्हायरल होत आहे. (Viral Video) हा व्हिडिओ पाहून तुमचं हसून-हसून पोट दुखेल. आतापर्यंत तुम्ही असे अनेक व्हिडिओ पाहिले असतील ज्यामध्ये अडचणीत सापडलेल्या प्राण्यांना माणसांनी बाहेर काढलं. अनेकदा भररस्त्यात गाडी थांबवून प्राणीप्रेमी त्यांना त्रासातून बाहेर काढताना आपण पाहिलं असेल. या व्हिडिओची सुरुवातदेखील अशीच आहे. एका गायीची मान झाडांच्या फाद्यांमध्ये अडकली होती. दोघेजण तिला वाचवण्यासाठी पुढे आले. त्यांनी उड्या मारून फांदी खेचली आणि गायीची सुटका केली. मात्र गायीची यातून सुटका होताच तिने दोघांवर हल्ला केला. जणू काही या दोघांनीच तिला या फाद्यांमध्ये अडकवलं होतं. हा व्हिडिओ आयएएस अधिकारी अवनीष शरण (IAS Officer Awanish Sharan) यांनी ट्वीटरवर शेअर केला आहे. हे ही वाचा- कॅन्सरग्रस्त चिमुकल्यांच्या वेदना हरपल्या; रितेशमुळं चेहऱ्यावर फुललं हसू
नेकी कर दरिया में डाल कहावत लागू होता है आदरणीय सर जी दुख देख कर रहा नहीं गया बेचारो को क्या पता था आ बैल मुझे मार हो जाएगा #कहावतें_संकलन
— Hemant Rathore🇮🇳 (@HR_CGBharat) February 13, 2021
हे ही वाचा- ‘Sorry Love, मी तुझं बर्गर खाल्लं’; Uber Eats च्या Delivery Boyचा तरुणीला मेसेज व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, झाडाच्या फाद्यांमध्ये गायीची मान अडकली आहे. ती गळा बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत असल्याचं दिसत होतं. हे पाहून मदतीसाठी दोघेजण पुढे आले. त्यांनी फांदी खेचून तिला बाहेर काढलं. तिची सुटका होताच गायीला राग येतो आणि ती दोघांवर हल्ला करते आणि पळून जाते. हा व्हिडिओ अवनीष शरण याने 13 फेब्रुवारी रोजी शेअर केला होता, ज्याचे आतापर्यंत 21 हजारांहून अधिक व्ह्यूज आणि 2 हजारांहून अधिक लाइक्स, 200 हून जास्त रिट्वीट्स केले आहेत. तर कमेंटमध्ये लोकांनी अनेक प्रतिकिया दिल्या आहेत.