जाहिरात
मराठी बातम्या / Viral / 'Sorry Love, मी तुझं बर्गर खाल्लं'; Uber Eats च्या Delivery Boy चा मेसेज पाहून तरुणी चक्रावली!

'Sorry Love, मी तुझं बर्गर खाल्लं'; Uber Eats च्या Delivery Boy चा मेसेज पाहून तरुणी चक्रावली!

Uber

Uber

त्यानंतर कहर म्हणजे डिलिव्हरी बॉयला टीप द्या असा मेसेज पाहून तरुणीला धक्काच बसला

  • -MIN READ
  • Last Updated :

ऑनलाइन ऑर्डर केल्यानंतर कधी एकदा जेवण हातात येतं असं होतं. बहुतांश वेळा डिलिव्हरी बॉय अपेक्षित वेळेत येत नाहीत. अशावेळी आपण कायम मोबाइलमध्ये त्याचं लोकेशन पाहत राहतो. काही दिवसांपूर्वी डिलिव्हरी बॉयकडून खाण्याचं पार्सर चोरी करुन त्याला मारहाण केल्याची बातमी समोर आली होती. आता तर कहरच झाला आहे. एका तरुणीला डिलिव्हरी बॉयने केलेला मेसेज बघुन पोट धरुन हसाल. त्याचं झालं असं की, लंडनमधील इली इलियास या 21 वर्षीय तरुणीने जेवणाची ऑर्डर केली होती. तिने बर्गर, चिप्स, आणि चिकन रॅपर अशी साधारण 20 डॉलर म्हणजेच साधारण 1456 रुपयांची ऑर्डर केली होती. तिने उबर इट्समधून (Uber Eats) ही ऑर्डर केली होती. मात्र बराच वेळ झाला तरी तरुणीची ऑर्डर काही आली नाही. काही वेळानंतर तिला एक मेसेज आला. तो पाहून तर तिला विचित्रच वाटलं. या डिलिव्हरी बॉयने तिला मेसेज केला होता, त्यात लिहिलं होतं, सॉरी love, मी तुझं जेवण खाल्लं. इतकच नाही तर अ‍ॅपमध्ये जेवणाची ऑर्डर डिलिव्हर झाल्याचं दाखवत होतं. याहून कहर म्हणजे डिलिव्हरी ड्रायव्हरला टीप देण्यासही सांगण्यात येत होतं.

जाहिरात

वाचा- पार्लरमध्ये ट्रीटमेंट घेणं या डॉक्टरला पडलं महागात, चेहऱ्याची अवस्था झाली ही त्यानंतर इलियाने या मेसेजचाकहर स्क्रीनशॉट ट्वीटरवर शेअर केला आणि हा उबेर इट्सचा ड्रायव्हर ठीक आहे ना, असा सवाल केला. त्यानंतर मात्र उबरने तिच्याशी संपर्क साधला व तिला मोफत जेवण पाठवलं. मात्र या प्रकारानंतरही तिने ड्रायव्हरला दोष दिला नाही. कदाचित तो भूकेला असेल त्यामुळे माझं जेवण खाल्ल असेल, असं ती म्हणाली. कोरोनासारख्या महासाथीमध्ये कोणा व्यक्तीवर बेरोजगाराची वेळ येऊ नये असं ती म्हणते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: food
  • First Published :
जाहिरात
जाहिरात