कर्करोगाविषयी जनजागृती करण्याकरिता 15 फेब्रुवारी हा दिवस इंटरनॅशनल चाईल्डवूड कॅन्सर डे म्हणून साजरा केला जातो. कर्करोगाबाबत माहितीचा प्रसार करणं आणि कर्करोग प्रतिबंधात्मक उपाययोजनांना प्रोत्साहन देणं, हे जागतिक कर्करोग दिवस साजरा करण्यामागील उद्दिष्ट आहे. या दिवसाच्या निमित्तानं अभिनेता रितेश देशमुखनं कर्करोगग्रस्त लहान मुलांची भेट घेतली. टाटा मेमोरिअल हॉस्पिटलमध्ये अनेक कर्करोगग्रस्त लहान मुलांचे उपचार सुरु आहेत. या मुलांची भेट घेऊन रितेशनं त्यांना कर्करोगाविरोधात लढण्यासाठी प्रोत्साहन दिलं. या विशेष भेटीचे फोटो सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. परंतु जागतिक आकडेवारीनुसार दरवर्षी कर्करोगाचे नव्याने निदान होणाऱ्या रूग्णांच्या संख्येत भर पडत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, कर्करोगाच्या माहितीचा प्रसार करून कर्करोगाने होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी करता येऊ शकते. यासाठी कर्करोग प्रतिबंधात्मक उपायांविषयी जागरूकता वाढविण्याच्या उद्देशाने जगभरातील कर्करोग संस्था आणि आरोग्य संघटना जागतिक कर्करोग दिवस साजरा करतात.