मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /WWE स्टार जॉन सिनाने शेयर केला Photo, विराटचे चाहते झाले कनफ्यूज!

WWE स्टार जॉन सिनाने शेयर केला Photo, विराटचे चाहते झाले कनफ्यूज!

WWE स्टार जॉन सिनाने (John Cena) टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचा (Virat Kohli) एक फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेयर केला आहे. या फोटोमध्ये विराट हातात बॅट पकडून उभा आहे.

मुंबई, 14 जून : WWE स्टार जॉन सिनाने (John Cena) टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचा (Virat Kohli) एक फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेयर केला आहे. या फोटोमध्ये विराट हातात बॅट पकडून उभा आहे. या फोटोला काही तासांमध्येच लाखो लोकांनी लाईक केलं आहे, पण जॉन सिनाने हा फोटो का शेयर केला याबाबत मात्र काहीही कळू शकलं नाही, त्यामुळे विराट आणि जॉन सिनाचे चाहते गोंधळात पडले. या फोटोला जॉन सिनाने कोणतंही कॅप्शन दिलं नाही.

View this post on Instagram

A post shared by John Cena (@johncena)

जॉन सिना अनेकवेळा फोटो शेयर करताना त्याला कॅप्शन देत नाही. कॅप्शन द्यायचं काम तो त्याच्या चाहत्यांवर सोडून देतो. विराटचा फोटो शेयर करत त्याने यावेळीही असंच केलं. जॉन सिनाने त्याच्या इन्स्टाग्राम बायोवरही याबाबत लिहिलं आहे. फोटोंना कॅप्शन न देता शेयर केलं जाईल, याला जाणून घ्यायची जबाबदारी तुमची, असं जॉन सिना त्याच्या इन्स्टाग्राम बायो मध्ये म्हणतो.

जॉन सिनाने विराट कोहलीचा कॅप्शन शिवाय फोटो शेयर केल्यानंतर चाहत्यांनीही याबाबत वेगवेगळे अंदाज बांधायला सुरुवात केली. 18 जूनपासून न्यूझीलंडविरुद्ध (India vs New Zealand) सुरू होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये (World Test Championship Final) जॉन सिना भारताचं समर्थन करत आहे, अशा प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या.

जॉन सिनाने याआधीही विराट कोहलीचा फोटो शेयर केला आहे. 2019 वनडे वर्ल्ड कपमध्येही भारत-न्यूझीलंड सेमी फायनलआधी जॉन सिनाने विराट कोहलीचा एक फोटो शेयर केला होता. पण त्या सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला आणि वर्ल्ड कपमधलं आव्हान संपुष्टात आला. आता दोन वर्षांनी टीम इंडियाकडे त्या पराभवाचा बदला घेण्याची संधी आहे.

First published:
top videos

    Tags: Team india, Virat kohli