वॉशिंग्टन, 30 एप्रिल: रस्त्यावर सायकल किंवा कोणतीही गाडी चालवताना अचानक तुमच्यासमोर भयंकर प्राणी आला तर तुमची काय अवस्था होईल. फक्त वाचूनच तुम्हाला घाम फुटला ना? अमेरिकेतील (America) एका महिलेने याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. अगदी मजेत ती सायकल चालवत होती आणि सायकलसमोर भलीमोठी मगर (Woman Encounter With Two crocodile) आली. सोशल मीडियावर मगरीचा हा व्हिडीओ सोशल मी़डियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) होतो आहे. ज्यात सायकल चालवणाऱ्या महिलेसमोर एक नाही तर चक्क दोन दोन मगरी आल्या. ती तिथंच स्तब्ध झाली.
व्हायरल हॉग युट्युग चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ फ्लोरिडातील असल्याचं सांगितलं जातं आहे. ही महिला सायकल चालवता चालवता व्हिडीओही शूट करत होती. त्यावेळी रस्त्यावरच एक मगर असल्याचं दिसलं. ही मगर आडवी होती. तिने महिलेचा रस्ता पूर्णपणे रोखला होता. तर दुसरी मगर महिलेच्या सायकलच्या शेजारी होती. हे वाचा - अरे बापरे! लांडग्याने घेतला जंगलाच्या राजाशी पंगा; सिंहाची शेपटी खेचली आणि… महिला खूप वेळ तिथं थांबली. दोन्ही मगरींची काही हालचाल होई ना. अखेर खूप वेळाने दोन्ही मगरी पळत पाण्यात जातात. त्यानंतर महिलेचा रस्ता मोकळा होता. पण ती इतकी घाबरलेली वाटते आहे की तिला आता आपला रस्ता मोकळा झाला आहे, आपण जायलं हवं याचंही भान राहिलं नाही. ती त्या मगरींकडेच पाहत राहिली. हे वाचा - भुकेला सिंह शिकारीसाठी पर्यटकांच्या गाडीकडे झेपावला आणि…; धडकी भरवणारा VIDEO खरंतर हा व्हिडीओ पाहून आपल्याही अंगावर काटा येतोच. जर या महिलेच्या जागी आपण असतो तर आपलीसुद्धा अशीच अवस्था झाली असती. एकतर आपण भीतीने गार होऊन तिच्यासारखं तिथंच स्तब्ध झालो असतो किंवा दुसऱ्या एखाद्याने भीतीने तिथून धूम ठोकली असती. हा व्हिडीओ पाहून त्यावर अशा बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत.