मुंबई, 29 एप्रिल : सिंह (Lion) म्हटलं तरी दरदरून घाम फुटतो. असा सिंह समोर आला तर मग काही खरं नाही. त्यातही तो भुकेनं व्याकूळ झाला असेल तर मग काय विचारूच नका. अशाच एका भुकेल्या सिंहाचा व्हिडीओ (Lion video) सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) होतो आहे. ज्यामध्ये सिंह अगदी आक्रमकपणे आपली शिकार करताना दिसतो आहे.
जंगल सफारीचा (Jungle Safari) हा व्हिडीओ पाहून तुम्हीसुद्धा हैराण व्हाल. पर्यटकांसमोर (Tourist Safari) एका भुकेल्या सिंहाने झेप घेतली आणि पुढे जे काही घडलं ते पाहून अंगावर अक्षरश: काटाच येईल. सिंहाने केलेल्या शिकारीचा जंगलातील हा थरार कॅमेऱ्यात पूर्णपणे कैद झाला आहे.
THIS IS NUTS pic.twitter.com/rk1cpMa445
— Sanade 🇯🇲🇺🇸 (@sweetsanade) April 12, 2021
व्हिडीओत पाहू शकता काही पर्यटक जंगल सफारी करत आहेत. इतक्यात त्यांच्यासमोर एक सिंह येतो. सामान्यपणे जंगल सफारी करताना एका ठिकाणी बसलेले किंवा रस्ता ओलांडताना सिंह नाही बरं का! तर चक्क भुकेने व्याकूळ झालेला आणि आक्रमकपणे शिकार करणारा हा सिंह.
हे वाचा - पैशांसाठी विषारी सापांनी भरलेल्या टबमध्ये बसला आणि...; पाहून अंगावर येईल काटा
जंगल सफारीची गाडी एका ठिकाणी थांबली आहे, ज्यात ड्रायव्हर आणि इतर पर्यटक आहेत. इतक्यात जमिनीवरील मातीची धूळ उडवत सिंह वेगाने धावत येतो. गाडीच्या दिशेने झेपावतो आणि त्यानंतर आपल्या शिकाऱ्यावर उडी मारतो. हा व्हिडीओ पाहून सुरुवातीला काळजात धस्सं होतं. कारण हा सिंह पर्यटकांच्या गाडीवरच धावून येतो आहे की काय, असंच काही क्षण वाटतं. सुदैवानं तसं होत नाही. सिंहाच्या पुढे एक दुसरा प्राणी धावत असतो आणि त्यालाच पकडण्यासाठी सिंह इतक्या वेगाने धावत येतो आणि त्याला आपल्या तावडीत धरतोच.
हे वाचा - VIDEO- सिंहाला पाहून पळत होता; जंगलाच्या राजाने झेप घेत मागून पंजात पकडलं आणि...
हा सर्व थरार पर्यटकांसमोर घडतो. सिंहाचं असं रूप प्रत्यक्षात पाहून त्यांनाही घाम फुटलाच असेल. व्हिडीओत तेसुद्धा स्तब्ध झालेले दिसत आहेत. हा व्हिडिओ टिकटॉकवर शेअर करण्यात आला होता. जो आता इतर सोशल मीडियावर व्हायरल झाला. @Sanade या ट्विटर युझरने ट्विटरवर हा व्हिडीओ पोस्ट केला आणि आता त्यावर बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shocking viral video, Viral, Viral videos, Wild animal