मुंबई, 30 एप्रिल : जंगलाचा राजा सिंह (Lion). ज्याला जंगलातील प्रत्येक प्राणी घाबरतो हे लहानपणापासून आपण गोष्टीत ऐकत आलोच आहोत. प्रत्यक्षात ही तसंच असतं. कारण सिंह (Lion video) आपली शिकार अगदी हुशारीने करतो. त्यामुळे एकदा का कोणी त्याच्या तावडीत सापडला तर मग त्याची सुटका अशक्यच. अशा सिंहाजवळ स्वतःहून कोण जाईल. पण अशी हिंमत केली ती एका लांडग्याने (wolf) . सिंहाशी पंगा घेणार्या लांडग्याचा व्हिडिओ (Lion and wolf video) सोशल मीडियावर व्हायरल (Social media viral video) होतो आहे. ज्यात लांडगा सिंहाची शेपटी खेचताना दिसतो आहे.
It’s not even easy to be a kings tail☺️ pic.twitter.com/iDiWLOdLqr
— Susanta Nanda (@susantananda3) April 24, 2021
व्हिडिओत पाहू शकता, एका झाडाखाली सिंह शांत झोपलेला आहे. तिथं एक लांडगा येतो. दचकत दचकत हळूच सिंहाकडे जातो. आणि एखाद्या मांजराची शेपटी ओढावी तशी तो या सिंहाची शेपटी खेचतो. हे वाचा - भुकेला होता सिंह, शिकारीसाठी पर्यटकांच्या गाडीकडे झेपावला आणि…; धडकी भरवणारा VIDEO शेपटीला लांडग्याचा हात लागल्यावर सिंह दचकून उठतो. तेव्हा लांडगा तिथून धूम ठोकतो. सिंह जागा होताच पळाला तरी सिंहाची नजर त्याच्यावर पडते. पण एकतर त्याचं पोट भरलेलं असावं किंवा त्याचा शिकारीचा मूड नसावा. त्यामुळे तो तसाच शांत बसून राहतो. लांडग्यांचं नशीब चांगलं आहे असंच म्हणावं लागेल. कारण सिंहाच्या शेपटीला हात घालूनही सिंहाने त्याला काही केलं नाही. तो खूप कूल होता. पण जर का हाच सिंह भुकेला असता किंवा लांडग्यांच्या या कृतीने संतापला असता तर मात्र त्या लांडग्याचं काही खरं नव्हतं. हे वाचा - घरात घुसून कोब्राने मारला कोंबडी आणि अंड्यांवर ताव; पुढे काय झालं ते तुम्हीच पाहा VIDEO आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी आपल्या ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. जो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यावर बर्याच मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत.