जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Zomato प्रकरणात आता हा VIDEO ठरला इंटरनेट सेन्सेशन; पाहा कोण खरं आणि कोण खोटं?

Zomato प्रकरणात आता हा VIDEO ठरला इंटरनेट सेन्सेशन; पाहा कोण खरं आणि कोण खोटं?

Zomato प्रकरणात आता हा VIDEO ठरला इंटरनेट सेन्सेशन; पाहा कोण खरं आणि कोण खोटं?

बंगळुरुतील एका मॉडेलने झोमॅटो डिलिव्हरी बॉयवर मारहाण केल्याचा आरोप केला होता. त्याची सत्यता सांगणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

Zomato डिलीव्हरी बॉयचं प्रकरण सातत्याने सोशल मीडियावर चर्चेत आहे. यावरुन सर्वसामान्य नागरिकांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेकजण प्रतिक्रिया देत आहेत. इतकचं नाही यावर मीम्स आणि जोक्सदेखील येत आहेत. यातच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (In the case of Zomato this VIDEO has now become an internet sensation See who is true and who is false) या व्हिडिओमध्ये एक तरुण आणि तरुणी झोमॅटोच्या त्या प्रसंगाबाबत वेगवेगळ्या शक्यता दाखविताना दिसत आहे. हा व्हिडिओ लोक पसंत करीत आहेत. बंगळुरुमध्ये एक झोमॅटो डिलिव्हरी बॉयवर मॉडेल हितेश चंद्राणीने आरोप केला होता की, त्याने तिच्या नाकावर मुक्का मारला. यानंतर मॉडेलने व्हिडिओ शेअर करुन तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. यावेळी तिच्या नाकातून रक्त येत होतं. यावर झोमॅटो डिलिव्हरी बॉयने मात्र त्यांच्यावर खोटा आरोप लावला जात असल्याचं सांगितलं. यानंतर देशभरात यावर जोरदार चर्चा केली जात आहे. सोशल मीडियावरदेखील अनेक मतमतांमते पाहायला मिळत आहे. काही लोक झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयवर नाराजी व्यक्त केली, तर काही लोकांनी महिलेवरही टीका केली आहे. मात्र अद्याप यामागील सत्य समोर आलेलं नाही. अशातच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये पहिल्यांदा नाक तोडल्याची शक्यता दाखविण्यात आली आहे. (In the case of Zomato this VIDEO has now become an internet sensation See who is true and who is false)

जाहिरात

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ ‘chudarshan’ नावाच्या अकाऊंटमधून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या माध्यमातून कोण योग्य आणि कोण अयोग्य असं काहीसं सांगण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून येत आहे. हा व्हिडिओ लोक पसंत करीत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात