मराठी बातम्या /बातम्या /Viral /

रिसेप्शनसाठी श्रृंगार करत असताना पतीनं दिलं अनोखं सरप्राइज; रोमॅंन्टिक VIDEO पाहून पडाल प्रेमात!

रिसेप्शनसाठी श्रृंगार करत असताना पतीनं दिलं अनोखं सरप्राइज; रोमॅंन्टिक VIDEO पाहून पडाल प्रेमात!

Bridal Makeup Video: सोशल मिडियावर अनेक इमोशनल व्हिडिओज व्हायरल होत असतात. त्यातला हा तुम्हाला नक्कीच आवडेल.

Bridal Makeup Video: सोशल मिडियावर अनेक इमोशनल व्हिडिओज व्हायरल होत असतात. त्यातला हा तुम्हाला नक्कीच आवडेल.

Bridal Makeup Video: सोशल मिडियावर अनेक इमोशनल व्हिडिओज व्हायरल होत असतात. त्यातला हा तुम्हाला नक्कीच आवडेल.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 14 मार्च : पती-पत्नीचं नातं प्रेम-आदर आणि विश्वासाचं नातं मानलं जातं. मात्र आयुष्यभराची सोबत जिवंत आणि ताजीतवानी ठेवण्यासाठी काही प्रयत्न करणं गरजेचं आहे. (Bridal Makeup Video Goes Viral)

या रोमँटिक नात्यात एकमेकांना दिलेली लहान-लहान सरप्राइझेस नात्यातला गोडवा टिकवून ठेवतात. अनेकदा ही सरप्राइझेस एक रुपयाही खर्च न करता सहज सोप्या, लहानशा कृतीतून देता येतात. (viral video of bride)

असंच एक सरप्राईझ आपल्या पत्नीला एका पतीनं दिलं. यात असं घडलं, की एक तरुणी आपल्या लग्नाचा वलीमा अर्थात रिसेप्शनसाठी तयार होत होती. तिथं ती आणि तिचा मेकअप-वेशभूषा करणारी महिला अशा दोघीच सलूनमध्ये होत्या. तेवढ्यात तिचा पती तिथं गेला आणि त्यानं एकदम काचेचं दार लोटत आत प्रवेश केला. (Beautiful bride Makeup for walima gets surprise)

हेही वाचा विद्यापीठात प्रपोज करणं पडलं चांगलंच महागात, व्हिडीओ ट्रेंड झाल्यानं कपलची फजिती

आरशात आपला झगमगते दागिने, मेकअप आणि सुरेख गुलाबी लेहंगा घातलेला लूक पाहत असलेल्या तरुणीला एकाएकी तिथं त्याचं प्रतिबिंब दिसलं. ती कमालीची आश्चर्यचकित झाली. तिच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. त्यानं तिचा हात हातात घेत नजरेनंच सुंदर दिसत असल्याचं सांगितलं. तीसुद्धा मस्त लाजली. या तरुणीचं नाव आहे रुमना. (Husband Surprises Bride Romantic Video)

हा व्हिडिओ Instagramवर मेकओव्हर बाय मनवीन या पेजवरून शेअर केला गेला आहे. या व्हिडिओला कॅप्शन देताना लिहिलं आहे, की प्रेम कायमच असं नितळ असतं, तिचा मेकअप करताना मी या सुंदर क्षणाची साक्षीदार होऊ शकले.

हेही वाचा तिला होती शेळीसोबत सेल्फी घेण्याची हौस, शेळीनं रागात येत थेट काय केलं पाहा

केवळ 35 सेकंदाचा हा व्हिडिओ दीड लाखांहून जास्त लोकांनी पाहिला आहे. (lovely video of husband surprising bride before walima party) लोकांनी या जोडप्याच्या प्रेमळ नात्याचं भरभरून कौतुक करत त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

First published:

Tags: Bridegroom, Viral video., Wife and husband