मुंबई, 30 डिसेंबर : मगरीसमोर (Crocodile video) तर चक्क वाघ, सिंह, बिबट्या असे प्राणीही जायला घाबरतात. नदीवर पाणी पितानाही मगर आपल्यावर हल्ला तर करणार नाही, याबाबत ते सावधच असतात. कारण मगर समोरच्याला कळायच्या आतच हल्ला करते आणि आपला डाव साधतं. एकदा का तिने शिकार आपल्या जबड्यात घेतली की मग त्याची सुटका अशक्यच. पण अशाच मगरीवर चक्क एक कासव भारी पडलं आहे (Crocodile tortoise video).
कासव म्हणजे मंद, शांत प्राणी अशी ओळख. तसं ते कुणावरच हल्ला करत नाही. पण तरी मगरीसारख्या प्राण्याशी पंगा घेणं म्हणजे जरा अतीच झालं नाही का? खरंतर यावर विश्वासही बसणार नाही. पण हे खरं आहे. एका कासवाने मगरीच्या जबड्यातील घास हिसकावून घेतला आहे आणि त्यापेक्षाही धक्कादायक म्हणजे मगर त्या कासवाचं काहीच करू शकली नाही. आपल्यापेक्षा कित्येक तरी पटीने शक्तीशाली असलेल्या मगरीवरही कासव ङारी पडलं आहे.
हे वाचा - तरुणाची भलतीच डेअरिंग! भुकेल्या चित्त्याची शिकार हिसकावली; पुढे काय घडलं पाहा
व्हिडीओत पाहू शकता पाण्यात एक भलीमोठी मगर दिसते आहे. त्याच्या शेजारी छोटंसं कासवही दिसतं आहे. मगर आणि कासवाला पाहणारी एक व्यक्ती पाण्यात खाण्याचा एक तुकडा टाकते. मगर ते खाण्यासाठी पुढे सरसावते. ती ते खाणार इतक्यात तिच्यापासून दूर असलेलं कासव पळत तिच्याजवळ येतं.
View this post on Instagram
अगदी त्या मगरीच्या जबड्याजवळच गेलं आणि त्या खाण्यावर तुटून पडलं. मगरीकडून ते खाणं हिसकावून ते तिथून पळून गेलं. बिच्चारी मगर मात्र काहीच करू शकली नाही. ती गप्पपणे ते पाहत राहिली.
हे वाचा - VIDEO - किंग कोब्रा आणि महाकाय अजगराची लढाई; विचारही केला नसेल असा भयानक शेवट
planetearth.explorer नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट कऱण्यात आला आहे. कुणालाही आपल्याबाबत इतक्या लवकर मत बनवू देऊ नका, असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. कासवाच्या हिमतीला सर्वांनी दाद दिली आहे. यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crocodile, Other animal, Viral, Viral videos