मराठी बातम्या /बातम्या /Viral /

Cobra Python fighting video - किंग कोब्रा आणि महाकाय अजगराची लढाई; विचारही केला नसेल असा भयानक शेवट

Cobra Python fighting video - किंग कोब्रा आणि महाकाय अजगराची लढाई; विचारही केला नसेल असा भयानक शेवट

Cobra python fight : कोब्रा आणि अजगराच्या खतरनाक फायटिंगचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल.

Cobra python fight : कोब्रा आणि अजगराच्या खतरनाक फायटिंगचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल.

Cobra python fight : कोब्रा आणि अजगराच्या खतरनाक फायटिंगचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल.

  • Published by:  Priya Lad

बँकॉक, 29 डिसेंबर : प्राण्यांच्या लढाईचे (Animal fight video) बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता एक महाकाय अजगर आणि एक किंग कोब्रा यांच्या लढाईचा व्हिडीओ चर्चेत आला आहे (Cobra python fighting video). तुम्ही विचारही केला नसेल असा या लढाईचा भयानक शेवट झाला आहे. हा व्हिडीओ पाहून अंगावर अक्षरशः काटाच येईल.

दोन्ही खतरनाक साप जेव्हा आमनेसामने येतात तेव्हा काय होऊ शकतं, हे या व्हिडीओतून दिसलं आहे. एक साप आपल्या भुकेसाठी लढत होता तर दुसरा आपला जीव वाचणवण्यासाठी. दोघांनीही एकमेकांना विळखा घातला. दोघंही एकमेकांवर भारी पडत होते. Catching Fierce Beast नावाच्या युट्यूब अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

व्हिडीओत पाहू शकता. कोब्राला अजगराने जखडून ठेवलं आहे. एकदा का कुणी अजगराच्या विळख्यात सापडलं तर त्याची सुटका जवळपास अशक्यच.

हे वाचा - Shocking Video! खेळणं म्हणून खेळत राहिला; चिमुकल्याला अजगराने घातला विळखा

पण कोब्राही कमी नव्हता. त्याने हार मानली नाही. महाकाय अजगरावरही तो भारी पडला. एका क्षणात त्याने बाजी पलटवली. त्याला आपल्या जबड्यात घेण्याच्या तयारीत असलेल्या अजगराला त्याने आपल्या विषारी दातांनी दंश केला. तोपर्यंत तो अजगरापासून स्वतःला वाचवत राहिला.

" isDesktop="true" id="650390" >

कोब्राच्या विषाचा अजगरावर परिणाम होऊ लागला. हळूहळू सापाभोवतलाच अजगराचा विळखा सुटला आणि कोब्राची त्याच्या तावडीतून सुटका झाली.

हे वाचा - घनदाट काळोखात लोकवस्तीत शिरला बिबट्या; तिघांना केलं रक्तबंबाळ,धडकी भरवणारा VIDEO

डेली मेलच्या रिपोर्टनुसार हा व्हिडीओ थायलँडच्या दक्षिण भागातील Nakhon Si Thammara आहे. 9 डिसेंबरचं हे दृश्य आहे. कोब्रा आणि ्जग आमनेसामने आले. त्यांची लढाई प्रत्यक्ष पाहणाऱ्या व्यक्तीने हे दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

First published:

Tags: King cobra, Python, Snake, Snake video, Viral, Viral videos