मराठी बातम्या /बातम्या /Viral /तरुणाची भलतीच डेअरिंग! चक्क भुकेल्या चित्त्याच्या समोरूनच ओढत घेऊन गेला त्याची शिकार; पुढे काय घडलं पाहा VIDEO

तरुणाची भलतीच डेअरिंग! चक्क भुकेल्या चित्त्याच्या समोरूनच ओढत घेऊन गेला त्याची शिकार; पुढे काय घडलं पाहा VIDEO

चक्क चित्त्याच्या तोंडून तरुणाने त्याचा घास हिसकावला आहे.

चक्क चित्त्याच्या तोंडून तरुणाने त्याचा घास हिसकावला आहे.

चक्क चित्त्याच्या तोंडून तरुणाने त्याचा घास हिसकावला आहे.

मुंबई, 30 डिसेंबर :  आपण काहीतरी खात असताना आपल्या हातातला किंवा ताटातला घास कुणी पळवला तर किती राग येतो ते तुम्हाला माहितीच आहे. एखाद्या ठिकाणी फिरायला गेल्यावर तिथं माकडं असतील तर तुम्ही याचा अनुभव नक्कीच घेतला असेल. माकडांनी तुमच्या हातातील कोणती ना कोणती तरी वस्तू पळवली असेल. त्यावेळी आपण माणूस असूनही आपला इतका राग येतो तरी कसंबसं आपण त्यावर कंट्रोल ठेवतो. पण जरा विचार करा, आपल्याजागी जर एखादा जंगली, हिंस्र प्राणी (Wild animal video) असेल आणि त्याची शिकार पळवली तर तो काय करेल? (Man snatched cheetah's prey video) फक्त कल्पनेनच घाम फुटला ना? तुम्ही कल्पनाही करू शकत नाही ते एका तरुणाने प्रत्यक्षात केली आहे.

वाघ, सिंह, बिबबट्या हे प्राणी आपली शिकार पकडताना किती मेहनत करतात, ते तुम्ही पाहिलंच असेल. अशा प्राण्यांच्या शिकारीचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. काही वेळा एका शिकारासाठी प्राणी भिडलेलेही दिसतात. त्यावेळी त्या प्राण्याची अवस्था कशी होते हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. मग जरा विचार करा, प्राण्यांऐवजी इथं माणूस असेल तर. म्हणजे एखाद्या माणसाने अशा हिंस्र प्राण्याची शिकार पळवली तर...

असाच खतरनाक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो. ज्यात एका तरुणाने चक्क चित्त्याच्यासमोरून त्याने केलेली त्याची शिकार ओढत नेली आहे. व्हिडीओत पाहू शकता एक भलमोठा चित्ता उभा आहे. त्याच्यासमोर एक व्यक्ती उभी दिसते आहे. या व्यक्तीचे फक्त पाय दिसत आहे. त्या व्यक्तीच्या हातात मृत हरिण दिसतं आहे. ज्याची शिकार याच चित्त्याने केली आहे.

हे वाचा - VIDEO - किंग कोब्रा आणि महाकाय अजगराची लढाई; विचारही केला नसेल असा भयानक शेवट

हा तरुण अगदी त्या चित्त्याच्या समोरून हे मृत हरिण म्हणजे चित्त्याची शिकार ओढत नेतो. त्यावेळी चित्ता पिसाळतो. त्याचा चेहरा पाहूनच आपल्याला धडकी भरते. आता या व्यक्तीचं काही खरं नाही, चित्ता त्याला काही सोडणार नाही असंच वाटतं. पण ही व्यक्ती काही घाबरत नाही. त्याची हिंमत तर पाहा. चित्ता इतका चवताळलेला दिसला तरी तो आपल्या हातातील त्याची शिकार काही सोडत नाही. उलट तो समोरून त्या हरिणाला ओढतच घेऊन जातो.

View this post on Instagram

A post shared by Sean Viljoen (@sean_viljoen)

अवघ्या काही सेकंदाचाच हा व्हिडीओ आहे. पण पाहून नेटिझन्स हैराण झाले आहेत. या व्यक्तीमध्ये इतकी हिंमत आली तरी कुठून असाच प्रश्न सर्वांना पडला आहे. यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.

हे वाचा - आश्चर्यच! याला कोकरू म्हणावं की बाळ? बकरीच्या पोटी जन्माला आलं माणसासारखं पिल्लू

फिल्म दिग्दर्शन सीन विलजोएन यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार हा छोटासा व्हिडीओ 12 चित्त्यांच्या शॉर्टफिल्मचा एक भाग आहे. लवकरच आम्ही 12 चित्त्यांवर एक शॉर्टफिल्म रिलीज तरणार आहोत. असं सीन यांनी सांगितलं आहे.

First published:

Tags: Viral, Viral videos, Wild animal