मराठी बातम्या /बातम्या /Viral /OMG! ट्रकच्या 3 चाकांखाली चिरडला तरी जिवंत राहिला; कसा झाला चमत्कार पाहा Shocking Video

OMG! ट्रकच्या 3 चाकांखाली चिरडला तरी जिवंत राहिला; कसा झाला चमत्कार पाहा Shocking Video

तब्बल तीन वेळा त्याच्या अंगावरून ट्रकचं भलंमोठं चाक गेलं. तरी ती व्यक्ती जिवंत राहिली.

तब्बल तीन वेळा त्याच्या अंगावरून ट्रकचं भलंमोठं चाक गेलं. तरी ती व्यक्ती जिवंत राहिली.

तब्बल तीन वेळा त्याच्या अंगावरून ट्रकचं भलंमोठं चाक गेलं. तरी ती व्यक्ती जिवंत राहिली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Viralimalai, India

मुंबई, 08 ऑगस्ट : ट्रकसारख्या अवजड वाहनाचं चाक किती मोठं असतं ते तुम्हाला माहितीच आहे. या चाकाखाली येणाऱ्या वस्तूंचाही चेंदामेंदा होतो मग माणसांचं काय होईल याची कल्पनाही करवत नाही. पण एक व्यक्ती मात्र अशा ट्रकच्या तीन-तीन चाकांखाली येऊनही जिवंत राहिली आहे. हा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. जो पाहून सर्वजण हैराण झाले आहेत.

ट्रकची चाकं अंगावरून जाऊन कुणी वाचलं असं सांगितलं तर साहजिकच कुणाचाही विश्वास बसणार नाही. त्यामुळे व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओने सर्वांनाच धक्का दिला आङे. व्हिडीओ पाहूनही तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.

व्हिडीओत पाहू शकता एक व्यक्ती समोरून भलामोठा ट्रक येताना पाहतो आणि अचानक स्वतःच मुद्दामहून त्या ट्रकसमोर येतो. ट्रकसमोर उडी मारण्याचा प्रयत्न करतो तोपर्यंत ट्रक पुढे जातो. त्यानंतर तो धावत ट्रकच्या समोर येतो आणि जिथं ट्रकचं चाक आहे, तिथं पोटावर झोपतो. त्यानंतर ट्रक त्या व्यक्तीच्या अंगावरून जातं.

हे वाचा - चमत्कार की नशीब! धावत रोड क्रॉस करताना भरधाव ट्रकखाली आली महिला; पण साधं खरचटलंही नाही

ट्रकचं पुढील एक आणि मागील दोन अशी तिन्ही चाकं या व्यक्तीच्या अंगावरून जातात. म्हणजे तब्बल तीन वेळा या व्यक्तीच्या अंगावरून ट्रक जातो. आता ही व्यक्ती काही जिवंत नसे, असंच वाटतं. पण पुढे जे घडतं ते पाहून तुम्ही हैराण व्हाल.

या व्यक्तीला काहीच झालं नाही आहे. इतक्या मोठ्या ट्रकचं चाक अंगावरून जाऊनही ही व्यक्ती जिवंत आहे. ट्रक गेल्यानंतर ही व्यक्ती स्वतःच उठून बसली.

हे वाचा - Shocking! रस्त्यावर चालता-बोलता धडधाकट व्यक्तीवर कोसळला मृत्यू; थरारक LIVE VIDEO

हा व्हिडीओ कुठला आणि कधीचा आहे माहिती नाही. Crazy Tweets ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. सुसाइट फेल असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. ट्रक जाऊनही या व्यक्तीला काहीच कसं झालं नाही हे पाहून नेटिझन्स हैराण झाले आहेत.

First published:

Tags: Accident, Truck accident, Viral, Viral videos