दुचाकीला धडक देऊन कार हवेत उडाली आणि 6 वेळा पलटली, अपघाताचा LIVE VIDEO

दुचाकीला धडक देऊन कार हवेत उडाली आणि 6 वेळा पलटली, अपघाताचा LIVE VIDEO

तब्बल चार वेळा कार पलटली आणि थांबली. हा सगळा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

  • Share this:

नागपूर, 12 सप्टेंबर : नागपूर-अमरावती रोडवर भरधाव कारने दुचारीस्वाराला धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. या भीषण अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे.

नागपूर अमरावती रोडवरील वाडी परिसरातील सेवा मारुती शोरूम समोरची 10 सप्टेंबर रोजी रात्री ही घटना घडली. या अपघातात संतोष भोंगाडे (वय 40 )यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे.

संतोष भोंगाडे हे आपल्या स्कुटरवरून जात होते. चौकात आल्यावर त्यांनी रस्त्या ओलांडण्यासाठी गाडी वळवली. तेवढ्यात समोरून एक भरधाव कार आली. काही सेंकदात कारने भोंगाडे यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली.

हा अपघात इतका भीषण होता की, जेव्हा कारने दुचाकीला धडक दिली त्यामुळे दुचाकी काही फूट दूर फेकली गेली. दुचाकीला धडक दिल्यानंतर कार हवेत उडाली आणि दूरपर्यंत फेकली गेली. तब्बल चार वेळा कार पलटली आणि थांबली.  हा सगळा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

या अपघातात दुचाकी चालक संतोष भोंगाडे गंभीर जखमी झाले होते. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या प्रकरणी  पोलिसांनी कार चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

Published by: sachin Salve
First published: September 12, 2020, 2:34 PM IST

ताज्या बातम्या