• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • 70 फुटांवरून कोसळला ट्रक; पण ड्रायव्हरला खरचटलंही नाही; भयंकर अपघाताचा आणि चमत्कारिक बचावाचा VIDEO

70 फुटांवरून कोसळला ट्रक; पण ड्रायव्हरला खरचटलंही नाही; भयंकर अपघाताचा आणि चमत्कारिक बचावाचा VIDEO

अपघाताचा हा व्हिडीओ पाहून तुम्हाला धडकीच भरेल. इतका मोठा अपघात होऊनही ड्रायव्हर बचावणं म्हणजे आश्चर्यकारकच आहे.

 • Share this:
  वॉशिंग्टन, 09 फेब्रुवारी : 70 फुटांवरून एखादी गाडी कोसळली तर काय होईल याची कल्पना आपणा सर्वांना आहेच. पण या ड्रायव्हरचं नशीब बलवत्तर म्हणून तो बचावला आहे. इतक्या उंचावरून गाडीसह खाली कोसळूनही त्याला साधं खरचटलंही नाही. अमेरिकेतील या भयंकर अपघाताचा (Accident video) व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (social media) व्हायरल (viral) होतो आहे. यूएसच्या विसकॉन्सिन (Wisconsin) शहरातील ही घटना आहे. इंटरचेंज हायवेवरून जाताना चालकाचं ट्रकवरील नियंत्रण सुटलं आणि हा अपघात (truck accident) झाला. ट्रक थेट पुलावरून खाली कोसळला. शनिवारी ही घटना घडल्याचं सांगितलं जातं आहे. हा पूल जमिनीपासून 70 फूट उंच होता. इतक्या उंचीवरून ट्रक कोसळला पण सुदैवानं जीवितहानी झाली नाही. ड्रायव्हर सुखरूप आहे. व्हिडीओत पाहू शकता. रस्त्याच्या बाजूला बर्फ साचलेला आहे. या बर्फावरच हा ट्रक आदळतो आणि रस्त्यावरील सुरक्षा भिंत तोडून थेट खाली कोसळतो. गाडीला अपघात झालेला पाहताच तिथं उपस्थित असलेले दोन जण धावत गाडीच्या दिशेनं आलं त्यांनी ड्रायव्हरला मदत केली. अपघाताचं हे दृश्यं  Wisconsin Department of Transportation सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं. हे वाचा - 4 वाघांनी घेरलं पण एकाच्याही तावडीत नाही सापडलं; बदकाच्या हुश्शारीचा VIDEO VIRAL डेली मेलनं दिलेल्या वृत्तानुसार अपघातानंतर ड्रायव्हर शुद्धीत होता आणि तो नीट श्वास घेत होता. त्याला कोणताही दुखापत झाली नाही. तरी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
  Published by:Priya Lad
  First published: