Home /News /viral /

4 वाघांनी घेरलं पण एकाच्याही तावडीत नाही सापडलं; बदकाच्या हुश्शारीचा VIDEO VIRAL

4 वाघांनी घेरलं पण एकाच्याही तावडीत नाही सापडलं; बदकाच्या हुश्शारीचा VIDEO VIRAL

वाघांच्या (tiger) तावडीतून एकदा सुटल्यानंतरही मुद्दामहून हे बदक (duck) त्यांच्यासमोर येत राहिलं आणि मग काय झालं ते तुम्हीच पाहा.

    मुंबई, 09 फेब्रुवारी : सिंह, वाघ, बिबट्या... जे शिकार करण्यात इतके तरबेज असतात की सावजाला काही समजायच्या आतच ते त्याच्यावर हल्ला करतात. एकाच फटक्यात ते शिकार करतात. त्यांच्या ताकदीसमोर कोणत्याच प्राण्याचं चालत नाही. पण तुम्हाला विश्वास बसणार नाही. अशा वाघांची एका छोट्याशा बदकानं मात्र चांगलीच दमछाक केली आहे. सोशल मीडियावर (social media) वाघ (Tiger) आणि बदकाचा (duck) व्हिडीओ व्हायरल (viral video) होतो आहे. एक नव्हे, दोन नव्हे तर चक्क 4 वाघांनी एका छोट्याशा बदकाला घेरलं. पण तरी ते बदक एकाच्याही तावडीत सापडलं नाही. बदकाच्या हुश्शारीचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. IFS अधिकारी रमेश पांडे यांनी आपल्या ट्विटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओत पाहू शकता चार वाघ एका बदकाची शिकार करण्यासाठी पाण्यात उतरलेत. चौघांनी सुरुवातीला त्याला चारही बाजूंनी घेरलं पण बदक हुशारीनं त्यांच्या तावडीतून सटकला. बरं सुटला म्हणजे तिथून त्यानं वाघांपासून दूर पळ काढला असंही नाही. तो वाघांच्या आसपासच राहिला आणि वाघांना चकवा देत होता. हे वाचा - आता माझी सटकली! मान पकडताच कोंबड्याचा कुत्र्यावर हल्लाबोल; खतरनाक Fighting Video बदक पाण्यातून हळूच बाहेर येऊन आपली झलक वाघांना दाखवतो. ज्या वाघाच्या नजरेत बदक पडतं तो वाघ त्या बदकाच्या दिशेनं धावत सुटतो आणि त्याला आपल्या पंज्यात पकडण्याचा प्रयत्न करतो. पण त्याच्या हातात काहीच सापडत नाही. बदक तिथून गायब होतो. पुन्हा दुसऱ्या दिशेला तो दिसतो, तिथंही दुसरा वाघ जातो आणि त्याला पकडण्याचा प्रयत्न करतो पण तिथंही वाघ फेल. असं एकदा नाही दोनदा नाही तर बऱ्याच वेळा होतं. चार चार वाघ मिळून त्या बदकाला पकडण्याचा प्रयत्न करतात. मध्येच ते बदकाला माहिती पडू न देताही त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतात पण तरीही त्यांच्या पदरी निराशाच पडते. हे वाचा - बोंबला! मजा म्हणून चिंपाझीच्या हातात दिली बंदूक आणि... पुढे काय घडलं पाहा VIDEO पाण्यात राहणारे डुबकी मारण्यात तरबेज असतात. बदकानं चार वाघांना पाण्यात हरवलं. निसर्गानं सर्व जीवांना कोणत्या ना कोणत्या पद्धतीनं स्मार्ट बनवलं आहे, असं कॅप्शन रमेश पांडे यांनी या व्हिडीओला दिलं आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यावर बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Tiger, Tiger attack, Viral

    पुढील बातम्या