मराठी बातम्या /बातम्या /Viral /

आईकडूनच मुलांच्या जीवाशी खेळ, पाहून अंगावर उभा राहिल काटा; VIDEO VIRAL

आईकडूनच मुलांच्या जीवाशी खेळ, पाहून अंगावर उभा राहिल काटा; VIDEO VIRAL

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

एका महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे, जिने गाडी चालवताना आपला आणि आपल्या मुलांचा जीव धोक्यात घातला आहे.

  • Published by:  Devika Shinde
मुंबई 21 सप्टेंबर : सोशल मीडियावर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ पाहायला मिळतात. ज्यामध्ये मनोरंजक, थरारक, कॉमेडी व्हिडीओ पाहायला मिळतात. येथे आपघाताचे व्हिडीओ देखील पाहायला मिळतात. हे व्हिडीओ कधीकधी आपल्याला बरंच काही शिकवून देखील जातात. खरंतर रस्त्यावरुन चालताना किंवा गाडी चालवताना आपल्याला सावधगीरी बाळगण्याची गरज असते. कारण येथे कधी कोणती परिस्थीती येईल हे काही सांगता येणार नाही. हे रस्ते अपघात गाडीतील बिघाडामुळे घडतात, पण त्यांपैकी बऱ्याचदा हे आपघात वाहन चालकांच्या चुकीमुळेच घडतात. कधी रस्त्यावर भरधाव वेगाने वाहने चालवणे, कधी वाहतुकीचे नियम मोडणे तर कधी काळजी न घेणे, या सर्व परिस्थितीमुळेच अपघाताची शक्यता वाढते. अशाच एका महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे, जिने गाडी चालवताना आपला आणि आपल्या मुलांचा जीव धोक्यात घातला आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला कार चालवत आहे आणि तिच्यासोबत तिची दोन्ही मुलेही कारमध्ये बसल्याचे दिसत आहे. त्यानंतर ही महिला वळणाच्या रस्त्यावर भरधाव गाडी चालवते, ज्यामुळे ती तिच्या मुलांसह लोखंडी गेटला जोरदार धडकते. या धडकेमुळे एक लहान मुलं आणि ती महिला गाडी खाली पडले, ती महिला लोखंडी गेटला ज्यापद्धतीनं धडकली ते पाहून तुम्ही अंदाजा लावू शकता की, या महिलेला किती जोरदार फटका बसला असाव. व्हिडीओ पाहाता तिच्या दोन्ही मुलांना नशीबीनं काहीही झालं नाही, पण ही महिला मात्र गंभीर जखमी झाली आहे. तिला धडक लागल्यानंतर तर काही काळ कळतच नव्हतं की तिला काय झालं आहे. या महिलेनं जर तिच्या गाडीच्या स्पीड कमी ठेवला असता, तसेच गाडी चालवताना खबरदारी घेतली असती, तर हा अपघात टाळता आला असता. हे वाचा : इथे महिला अचानक कापू लागल्या केस आणि जाळू लागल्या हिजाब, व्हायरल व्हिडीओनं एकच खळबळ ट्विटरवर शेअर केलेला या 26 सेकंदाच्या व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंड होत आहेत. ज्यावर लोक कमेंट आणि शेअर करत आहेत. हा व्हिडीओ आतापर्यंत 1.4 दशलक्षाहून अधिक लोकांनी पाहिला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकजण वेगवेगळ्या कमेंट करताना दिसले. काही लोक संतापले तर काही लोकांना धक्का बसला.
First published:

Tags: Shocking viral video, Social media, Top trending, Viral videos

पुढील बातम्या