मुंबई, 12 जुलै : जास्त वेळा चहा पिणे हे पोटात गॅस (Stomach Gas) तयार होण्याच्या लक्षणांपैकी एक आहे. याशिवाय बाहेरचे पदार्थ खाणे आणि अनियमित दिनचर्या हेदेखील गॅस तयार होण्याचे कारण असू शकते. जर तुम्ही गॅसच्या समस्येने (Stomach Pain) त्रस्त असाल तर आज आम्ही तुम्हाला असे काही घरगुती उपाय सांगणार आहोत. ज्याचा उपयोग करून तुम्ही पोटातील गॅस (Get Rid of Stomach Gas) त्वरित बाहेर काढू शकता. हे उपाय तुम्हाला गॅसच्या समस्येपासून मुक्त करतील. चला जाणून घेऊया या घरगुती उपायांबद्दल. ओवा ओव्यामध्ये थायमॉल नावाचे संयुग असते, जे गॅस्ट्रिक रस स्राव (Gastric Juice) करते आणि पचनास मदत करते. गॅसमुळे पोट (Blotted Stomach) फुगल्यास तुम्हीही अर्धा चमचा ओवा पाण्यासोबत खाऊ शकता. यामुळे तुम्हाला आराम मिळेल. Pregnancy Tips : गर्भ राहण्यासाठी पाळीच्या कितव्या दिवशी संबंध ठेवावे? जिऱ्याचे पाणी गॅस्ट्रिक किंवा गॅसच्या समस्येवर जिरे पाणी हा उत्तम घरगुती (Stomach Gas Home Remedy) उपाय आहे. जिऱ्यामध्ये आवश्यक ऑइल असतात. जे लाळ ग्रंथींना उत्तेजित करतात. त्यामुळे अन्नाचे पचन व्यवस्थित होते. तसेच पोटात अतिरिक्त गॅस तयार नाही. जिरे पाणी बनवण्यासाठी एक चमचे जिरे दोन कप पाण्यात 10-15 मिनिटे उकळा. आता ते थंड होऊ द्या आणि जेवणानंतर प्या. हिंग कोमट पाण्यात अर्धा चमचा हिंग मिसळून प्यायल्याने पोटातील गॅसपासून त्वरित आराम मिळतो. हिंगामुळे पोट साफ होते आणि गॅसपासून आराम मिळतो. आल्याचा चहा आल्याचा उपयोग अनेक रोगांवर होतो. पोटातील गॅस दूर करण्यासाठी तुम्ही ताजे आलेदेखील वापरू शकता. पोटातील गॅसपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही आल्याचा चहा पिऊ शकता. आल्याचा चहा म्हणजे दुधाचा चहा नाही. पोटातील गॅसमध्ये आराम मिळण्यासाठी ताज्या आल्याचे तुकडे एक कप पाण्यात टाकून चांगले उकळा आणि ते कोमट असतानाच प्या.
Pregnancy Tips : तुम्ही गरदोर आहात की नाही, किती दिवसांत कळते?बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस बेकिंग सोडा आणि लिंबाचा रसदेखील पोटातील गॅस दूर करण्यासाठी उपयुक्त असते. यासाठी एक कप पाण्यात एक चमचा लिंबाचा रस, अर्धा चमचा बेकिंग मिसळा आणि ते प्याव. यामुळे पोटातील गॅसपासून त्वरित आराम मिळतो.