Home /News /lifestyle /

महिलांच्या फक्त पोटातच नव्हे तर Vagina मध्येही होतो गॅस; काय आहेत कारणे आणि उपाय पाहा

महिलांच्या फक्त पोटातच नव्हे तर Vagina मध्येही होतो गॅस; काय आहेत कारणे आणि उपाय पाहा

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

Vaginal gas causes and treatment : बहुतेक महिलांना व्हजायनातून गॅस बाहेर पडण्याची समस्या असते.

मुंबई, 16 जून : पोटातले गॅसेस (Gases) अनेकांच्या काळजीचं कारण ठरतात. कारण सामाजिक ठिकाणी हे गॅसेस बाहेर पडले, तर होणारा विचित्र आवाज चेष्टेचा विषय होतो. स्त्रियांनाही असा अनुभव येऊ शकतो; मात्र तो पोटातल्या गॅसेसमुळेच नव्हे, तर योनिमार्गातल्या गॅसेसमुळेही येऊ शकतो. काही वेळा शरीरसंबंधांवेळी किंवा व्यायामावेळी योनीमार्गातून गॅस (Vaginal Gases) बाहेर पडतो. याचा आरोग्याशी तसा काही संबंध नसला, तरी हे का घडतं व त्यावर काय करायचं हे स्त्रियांनी जाणून घेतलं पाहिजे. योनीमार्गातून गॅस बाहेर पडणं याला ‘क्वीफ’ असंही म्हटलं जातं. शरीराच्या आतून नाही, तर बाहेरून आलेली हवा जेव्हा योनिमार्गात अडकलेली असते आणि बाहेर जाते, तेव्हा हा आवाज होतो. त्यालाच व्हजायनल गॅसेस (Vaginal Gases) म्हणतात. या गॅसेसना कोणताही वास नसतो. योनीमध्ये अडकलेली हवा हळूहळू किंवा अचानक बाहेर पडते तेव्हा एक आवाज येतो. योनिमार्गात कंपनं तयार होऊन हा आवाज येतो. याचा आरोग्यावर (No Bad Effect On Health) कोणताही विपरीत परिणाम होत नाही. स्त्रियांना योनिमार्गाविषयी काही तक्रारी असतात. व्हजायनल गॅसेस ही तशीच तक्रार आहे, असं स्त्रियांना वाटू शकतं; मात्र त्यात घाबरण्यासारखं काहीच नसल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. हा कोणताही आजार किंवा शारीरिक समस्या नाही. हे खूप नॉर्मल असतं. हे वाचा - अरे देवा! कोरोना महासाथीत आता Acute enteric epidemic; नव्या आजाराच्या उद्रेकाने चिंता वाढवली संभोगाच्या वेळी (Sexual Activity) पेनिसच्या आत-बाहेर अशा हालचालीमुळे कधीकधी योनिमार्गात हवा जाऊ शकते. तिथल्या स्नायूंवर ताण आला, की ती हवा बाहेर पडते. त्याचा आवाज होऊ शकतो व बुडबुड्यांप्रमाणे वाटू शकतं. योनिमार्गात घातलं जाणारं टॅम्पॉन (Tampons) किंवा मेन्स्ट्रुअल कप (Menstrual cup) यांमुळेही तिथे हवा अडकू शकते. मग ते बाहेर काढल्यावर किंवा कधीकधी व्यायाम करताना ही हवा बाहेर पडते. ओटीपोटाचं कार्य बिघडण्यामागे व्हजायनल गॅसेस हे कारण नसतं. ओटीपोटातल्या सामान्य फ्लीट्सप्रमाणेच याचा परिणाम असतो, असं अभ्यासावरून निदर्शनाला आलं आहे. ओटीपोटाची स्थिती किंवा शिथिलता हेदेखील या गॅसेसचं कारण असू शकतं. कधीकधी स्त्री-रोगतज्ज्ञांकडून तपासणी करताना ओटीपोटातल्या स्नायूंवर ताण येतो. खोकला किंवा व्यायामामुळेही या स्नायूंवर ताण येऊ शकतो. अशा वेळी तिथे हवा अडकू शकते व ती बाहेरही पडू शकते. हे वाचा - मासिक पाळी सुसह्य होण्यासाठी लक्षात ठेवा 'या' 5 गोष्टी अशा प्रकारचे गॅसेस हे कोणत्याही आजाराचं लक्षण नाही. त्यामुळे त्यावर फारसे उपाय नाहीत. केवळ योनिमार्गातली हवा बाहेर पडल्यामुळे थोडा आवाज होतो. त्यामुळे पोटात किंवा योनिमार्गात दुखतही नाही. त्यामुळे यासाठी ओषधाची गरज नसते. मात्र हा त्रास वारंवार होत असेल, तर वैद्यकीय सल्ला जरूर घ्यावा.
First published:

Tags: Gas, Health, Lifestyle, Woman

पुढील बातम्या