कराची 09 डिसेंबर : अनेकदा प्रवासादरम्यान तुम्ही पाहिलं असेल की, सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करताना बस, टॅक्सीचे चालक गाडी थांबवून स्वत:साठी काही वस्तू खरेदी करतात. मात्र रेल्वे चालकाने ट्रेन थांबवली आणि हे कृत्य करायला सुरुवात केली तर? यावर तुमचा विश्वास बसणार नाही मात्र पाकिस्तानात प्रत्यक्षात ही घटना पाहायला मिळाली. यात एका रेल्वे चालकाने दही खरेदीसाठी प्रवाशांनी भरलेली ट्रेन थांबवली (Train Driver Stopped a Train to Buy Yogurt). हेही वाचा - दुचाकीवर घातक स्टंट करताना बॅलन्स बिघडला अन्…; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO डॉनने दिलेल्या बातमीनुसार, भरधाव वेगात ट्रेन घेऊन जाणाऱ्या ड्रायव्हरला अचानक दही खाण्याची इच्छा झाली. वाटेत एक गाव दिसल्यावर त्याने मध्येच ट्रेन थांबवली आणि आपल्या सहाय्यकाला दही खरेदी करायला पाठवले. या घटनेमुळे पाकिस्तानमधील रेल्वेची सुरक्षा चव्हाट्यावर आल्याचं बोललं जात आहे. चुकीचे व्यवस्थापन आणि दुर्लक्ष यामुळे अनेक अपघात होत आहेत.. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Shocking Video Viral) झाल्यानंतर पाकिस्तानी रेल्वे विभाग चांगलाच अडचणीत आला आहे. यावर अनेक युजर्सनी कमेंट करून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एका यूजरने ट्विट करून लिहिलं की, या भावाने दही खाण्यासाठी ट्रेन थांबवली…यावरून कळतं इथे सरकारी नोकर किती हलगर्जी आहेत.. दही खाण्यासाठी ट्रेन कोण थांबवतं..!
Inter-city train driver in Lahore gets suspended after making unscheduled stop to pick up some yoghurt.#pakistan #Railway #ViralVideo pic.twitter.com/n6csvNXksQ
— Naila Tanveer🦋 (@nailatanveer) December 8, 2021
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना लाहोरच्या कान्हा रेल्वे स्टेशनजवळची आहे. आजूबाजूला उपस्थित काही लोकांनी या घटनेचा व्हिडिओ बनवला, जो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अपघात, प्रवाशांची सुरक्षितता आणि घटणारा महसूल अशा विविध मुद्द्यांमुळे अडचणीत सापडलेल्या रेल्वे विभागावर या व्हिडिओ क्लिपनंतर टीकेची झोड उठली होती. हेही वाचा - बापरे! स्ट्रीट फूडमध्ये महिलेला सापडलं असं काही की VIDEO पाहून थरकाप उडेल मंत्र्यांनी कारवाई केली असून ड्रायव्हर राणा मोहम्मद शहजाद याला निलंबित करण्याचे आदेश पाकिस्तान रेल्वे लाहोर प्रशासनाला दिले. रेल्वेचे प्रवक्ते सय्यद इजाज म्हणाले की, जेव्हा तुम्ही मध्येच रुळावर ट्रेन थांबवता तेव्हा तो सुरक्षेचा प्रश्न बनतो. त्यामुळे अशा घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत.