मराठी बातम्या /बातम्या /Viral /

दुचाकीवर घातक स्टंट करताना बॅलन्स बिघडला अन्...; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

दुचाकीवर घातक स्टंट करताना बॅलन्स बिघडला अन्...; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये (Shocking Accident Video) तुम्ही पाहू शकता की एका रस्त्यावर अनेक लोक उभा आहेत. यासर्वांसमोरच एक मुलगा आपली बाईक घेऊन येतो आणि आपल्या महागड्या बाईकवर स्टंट करण्याचा प्रयत्न करतो.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 09 डिसेंबर : जगातील जवळपास प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की त्याच्याकडे महागडी दुचाकी असावी. जी पूर्ण वेगात पळवून त्याच्यावर कमालीचे स्टंट करता यावे. ज्यांच्याकडे अशी बाईक असते, त्यातील काही लोक तर आपल्या जीवाची पर्वा न करता घातक स्टंट करताना दिसतात. अनेकदा त्यांचे हे स्टंट त्यांना प्रसिद्धी मिळवून देतात. तर अनेकदा हे स्टंट त्यांनाच महागात पडतात. सध्या एक असाच स्टंट व्हिडिओ (Viral Stunt Video) चर्चेचा विषय ठरला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल.

हेही वाचा - बापरे! स्ट्रीट फूडमध्ये महिलेला सापडलं असं काही की VIDEO पाहून थरकाप उडेल

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये (Shocking Accident Video) तुम्ही पाहू शकता की एका रस्त्यावर अनेक लोक उभा आहेत. यासर्वांसमोरच एक मुलगा आपली बाईक घेऊन येतो आणि आपल्या महागड्या बाईकवर स्टंट करण्याचा प्रयत्न करतो. स्टंट चांगला करण्यासाठी हा तरुण आधी अगदी वेगात बाईक चालवत येतो आणि आपली कला दाखवतो. मात्र, काहीच वेळात त्याचा बॅल्नस बिघडतो आणि तो बाईकसह खाली कोसळतो. घटनेचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

लोक हा व्हिडिओ एकमेकांसोबत शेअर करण्याबरोबरच यावर निरनिराळ्या कमेंटही करत आहेत. हा घातक स्टंट करण्यासाठी या तरुणाच्या धाडसाचं कौतुक करावं की त्याच्या वेडेपणाची निंदा, हेच लोकांना समजत नाहीये. एका यूजरने या व्हिडिओवर कमेंट करत म्हटलं की खरंच स्टंटबाजी करण्याच्या नादात लोक आपला जीवही धोक्यात टाकतात. तर दुसऱ्या यूजरने म्हटलं की हा जीवघेणा स्टंट होता. या लोकांना कधी कळेल की यांच्यामुळे इतरांचाही जीव जाऊ शकतो.

हेही वाचा - VIDEO - हे काय? फेऱ्यांआधी नवरीबाईने दिला 'जोर का झटका'; ते रूप पाहून पाहुणे शॉक

हा व्हिडिओ ट्विटरवर भारतीय पोलीस सेवेचे अधिकारी दिपांशू काबरा यांनी शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं, भरधाव वेगाचा मूर्खपणा रस्त्यार दाखवू नका, व्ह्यूज लाखो मिळतीलही पण जीव वाचणार नाही. रस्ता आणि गाडी. स्टंट करून 'मर्दानगी'चं प्रदर्शन करण्यासाठी. पालकांनी आपल्या मुलांच्या रोडवरील आणि ऑनलाईन activities वर नजर ठेवायला हवी. त्यांची एक चूक तुमच्यासाठी आयुष्यभराचा पश्चाताप ठरू शकते. बातमी देईपर्यंत हा व्हिडिओ ८ हजारहून अधिकांनी पाहिला आहे. अनेकजण या व्हिडिओ कमेंट करत या तरुणाला सल्ले देत आहेत.

First published:

Tags: Shocking video viral, Stunt video